Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

दिव्य निर्धार ः वृत्तसेवा
नागपूर ः शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी ताडोबा, पेंच, नागझिरा, सिल्लारी येथे पर्यटनासाठी अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातात. नागपूर सोडताना मंत्री, आमदार, नेत्यांकडून खास संत्रा बर्फीची मागणी केली जाते. अधिवेशनाच्या शेवटी लाखो रुपयांच्या मिठाईची विक्री होते. ही सर्व उलाढाल सुमारे अडीचशे कोटींच्या आसपास असते. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात व बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण होत असते. याशिवाय संत्र्याची मागणी वाढते. नागपूरच्या सावजी हॉटेलची विशेष क्रेझ सर्वाच पाहुण्यांना असल्याने त्यांची उलाढालही वाढते.

हिवाळी अधिवेशन लहान, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या अधिवेशन काळात शहरात तब्बल साडे चार हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेतले जाते. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी आलेल्या कर्मचाऱ्यांची सरभराई करण्यात स्थानिक विभागाचे अधिकारी सज्ज आहेत.
अधिवेशनासाठी हजारो कर्मचारी व मोचांसाठी लाखो नागरिक १५ ते २० दिवसांच्या कालावधीसाठी शहरात येतात. अधिकाऱ्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली जाते. रविभवन व आमदार निवासात रोजंदारीने कामगार नेले जातात. या काळात शहरातील खानावळी हाऊसफुल्ल असतात.
बर्डी, महाराजबाग परिसरातील खानावळींमध्ये सायंकाळनंतर बसायला जागा मिळत नाही. अधिकारी व मंत्री हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात. त्यामुळे पानठेला चालक ते हॉटेलचालकांसाठी हा सुगीचा काळ असतो. वेळेवर दुप्पट भाडे देण्याची तयारी असतानाही खोली मिळणेही अवघड होते. त्यातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते. हिवाळी अधिवेशन साडे चार हजार कोटीचे मॉलला मात्र या काळात हवी तशी झळाळी येत नाही. दरम्यान, अधिवेशनाच्या निमित्ताने हॉटेल्सही हाऊसफुल्ल झालेले आहेत

हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ नाताळच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. अधिवेशनामुळे शहरासह आजूबाजूचे रिसोर्टही हाऊसफुल्ल झालेले आहेत. केंद्रीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री नागपुरातील असल्याने कायम हॉटेलमध्ये गर्दी असते. अधिवेशनामुळे त्यात अजूनच भर पडली आहे. गुरुवारपासून हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बुक आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्याअनुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत..

संबंधित पोस्ट

देशमुखांना दिलासा नाहीच! ;उच्च न्यायालयाचा तपासात हस्तक्षेपास नकार

divyanirdhar

प्रत्येकाने बुद्धाच्या तत्त्वज्ञाने पालन करणे आवश्यक : महाराष्ट्र विद्रोही चळवळीचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव

divyanirdhar

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी;‘कॅग’प्रमाणेच सरकारच्या समितीचेही त्रुटींवर बोट

divyanirdhar

ग़डचिरोली: लसीकरणासाठी मंत्री वडेट्टीवार आग्रही, काय म्हणाले वाचा…

divyanirdhar

तथागत गौतम बुद्धांचे जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्वज्ञान : केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

divyanirdhar

परिटांचा आक्रोश सरकारला पडणार महाग; आरक्षणासाठी डी.डी. सोनटक्के यांच्या लढ्याला येणार धार

divyanirdhar