जिल्हा प्रतिनिधी/दिव्यनिर्धार
पोंभूर्णा(चंद्रपूर)ः विलास भाकरे याच्यावर जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करून त्याच्याच नातेवाईकांनी सावली तालुक्यातील कवठी येथून काही भाडोत्री गुंड बोलावले. त्यांनी कायदा हातात घेत रात्री गावात भाकरे यांचा पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी देत होते.
जादूटोणा केल्याच्या कारणावरून बाहेरील गावगुंडांनी तालुक्यातील जुनगावात बंदुका, तलवारी काढून गावात दहशत पसरवली. या प्राणघातक हल्लयात एक जण जखमी झाला. गावातील एका व्यक्तीच्या घरी विलास भाकरे यांनी आसरा घेतल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी बेंबाळ पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.
विलास भाकरे याच्यावर जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करून त्याच्याच नातेवाईकांनी सावली तालुक्यातील कवठी येथून काही भाडोत्री गुंड बोलावले. त्यांनी कायदा हातात घेत रात्री गावात भाकरे यांचा पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी देत होते. मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली. या गुंडाच्या हातात तलावारी व बंदूक दिसत असल्याने कुणीही ग्रामस्थ मध्यस्थीसाठी पुढे आले नाही. दरम्यान, भाकरे यांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
गावातील काही लोकांनी बेंबाळ पोलिस चौकीला याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस गावात दाखल झाले. पोलिसांचे वाहन दिसताच या गुंडांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत ठावरी करीत आहेत.