Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

स्थानिकांना युवकांना वेकोलीत रोजगार देणार : सुनील केदार

नागपूर : स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याविषयी वेस्टन कोल फिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन आज पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या टेकाडी सर्कलअंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी, कांद्री आणि टेकाडी या ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामांचे भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, पारशिवनी पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, माजी आमदार एस. क्यू. जामा, पंचायत समिती सदस्य करुणा भोवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोविड काळात जिल्हा परिषदेने उत्तम कामामुळे त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या. आता कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे.संसर्ग आटोक्यात आल्याने विकासकामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन नळजोडणी करुन प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून विविध विकासकामे सुरु आहेत. कोविड काळात पारशिवनी तालुक्यात वेळीच विलगीकरण केंद्र सुरु केल्यामुळे अनेक ग्रामीण नागरिकांचे जीव वाचवता आल्याचे सांगून खनिज विकास निधीतून ११ रुग्णवाहिका मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कांद्री कन्हान येथे गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरी सुविधा योजना, जनसुविधा योजना, आरोग्य देखभाल दुरुस्ती योजना, वस्ती सुधार योजना, रमाई आवास योजना, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम, रस्ते विस्तारीकरण, पाणंद रस्तेनिर्मिती, सिमेंट रस्ते बांधकाम, सामाजिक सभागृह बांधकाम, रस्ता खडीकरण, सामाजिक स्वयंपाकगृह बांधकाम, नाली बांधकाम, व्यसनमुक्ती केंद्र बांधकाम आदी एकूण १४ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.

संबंधित पोस्ट

व्यांगाच्या शाळांकडे सरकारचे दुर्लक्ष; सातवा वेतन आयोग नाही; विविध प्रश्न जैसे थे

divyanirdhar

कोरोना रुग्णाचा उपचार मोफत करा : डी.डी. सोनटक्के

divyanirdhar

स्वच्छतेचे खरे अग्रदूत संत गाडगेबाबाच; डी.डी. सोनटक्के, गाडगे बाबा स्वच्छता अभियान कागदावरच का?

divyanirdhar

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र काढले

divyanirdhar

बोरीच्या धरतीधन सीड कंपनीवर गुन्हा दाखल; चार कोटी 20 लाखांचा माल जप्त

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar