Divya Nirdhar
Breaking News
mumbairain
आंतरराष्ट्रीयठळक बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मुंबई झाली पुन्हा हवालदिल, पावसाचा कहर

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उपनगरात बुधवारी सरासरी २२०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर, शहर भागात ४५.६ मिलीमीटर पाऊस झाला. पुढील तीन दिवस मुंबई आणि परिसरात देण्यात आलेला अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. कोरोनामुळे संकटात असलेल्या मुंबईवर मात्र पुन्हा पावसाने संकट आणले आहे.
राज्यात आनंद घेऊन येणाऱ्या पावसाची सुरुवात मुंबईसाठी मात्र जनजीवन विस्कळित करणारी ठरली. मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांत कहर केला. तुंबलेले रस्ते, बंद पडलेली लोकल आणि चिखलातून वाट तुडवत घर किंवा कार्यालय गाठताना मुंबईकरांना कसरत करावी लागली.
पहिल्याच दिवशी पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले आणि पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचे पालिकेचे दावे निकाली निघाले. बंगालच्या उपसागरात ११ जूनला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने ९ ते १२ जून दरम्यान मुंबई आणि कोकणपट्ट्यात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरवत मोसमी पाऊस अपेक्षित तारखेच्या (११ जून) दोन दिवस आधीच (९ जून) मुंबईत दाखल झाला. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथेही जोरदार पावसाने हजेरी लावली.
सांताक्रुझ केंद्रात जूनमधील सरासरी पावसाची नोंद ५०५ मिमिपर्यंत होते. सांताक्रुझ केंद्राने बुधवारी सरासरी २२०.६ मिलीमीटर, तर शहर भागांतील पावसाची नोंद करणाऱ्या कु लाबा केंद्राने सरासरी ४५.६ मिमि पावसाची नोंद के ली. सकाळी पावसाचा जोर इतका होता की, ८.३० ते ११.३० या के वळ तासांच्या कालावधीत सांताक्रूझ केंद्राच्या मापकावर सरासरी १०२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यात दिवसभरात १६२.६ मिलीमीटर पाऊस झाला.
मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. बृहन्मुंबई महानगरपालिके च्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांच्या नोंदीनुसार बुधवारी मुंबईतील दहा विभागांमध्ये २०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यात वडाळा एफ/उत्तर विभाग, दादर, वेसावे (वर्सोवा), अंधेरी पश्चिाम, वांद्रे पश्चिाम विभाग, मरोळ, अंधेरी, कु र्ला, घाटकोपर यांचा समावेश आहे. अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये हा पाऊस कोसळत असताना, सकाळी ११.४५ वाजता समुद्रात ४.१६ मीटर उंच लाटांची भारती होती. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले.

नाले सफाई, पावसाळी तयारी यांच्या घोषणा फोल असल्याचे पहिल्याच दिवशीच्या पावसाने उघड केले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सकाळीच उपनगरीय रेल्वे बंद करण्याची वेळ आली. साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी उभी होती. नाल्यांच्या जवळील घरांमध्ये यंदाही पाणी शिरले. निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवसाय होण्याच्या आशेने सुरू झालेल्या शहरातील बाजारपेठांमध्येही पाणी शिरले.
मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर पुढील दोन-तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने १३ जूनपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे सावधानतेचा इशारा कायम आहे. गुरुवारी दुपारी १२.१७ मिनिटांनी समुद्रात भरती येणार असून यावेळी लाटांची उंची ४.२६ मीटर असेल. तसेच सायंकाळी ६.१४ वाजता ओहोटीची वेळ असून यावेळी लाटांची उंची १.९४ मीटर असेल. रायगड येथे गुरुवारीही अतिदक्षतेचा इशारा कायम आहे.

मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईत संततधार होती. बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस कोसळत होता. सायंकाळी काही भागांमधील पावसाचा जोर कमी झाला. मुंबईत जून महिन्यातील पावसाच्या एकू ण सरासरीच्या ४० टक्के पाऊस बुधवारी एकाच दिवसात उपनगरांमध्ये कोसळला.
मध्य रेल्वे १० तास ठप्प

संबंधित पोस्ट

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

खरंच, आपण बौद्ध आहोत?

divyanirdhar

पासपोर्टच्या धर्तीवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; बार्टीने सादर केला सामाजिक न्याय विभागाला प्रस्ताव

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीत; समर्थकांमध्ये जल्लोष

divyanirdhar

पावसाचा फटका : मालाड भागात चार मजली इमारतीचा भाग कोसळून 11 ठार

divyanirdhar

सरकार काय मेल्यावर पैसे देईल़, रमाई घरकुल योजनेचा निधी आटला़

divyanirdhar