Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यामहाराष्ट्र

एआय अंगणवाडी’, ‘दवाखाना आपल्या दारी’ उपक्रमांना स्कॉच अवॉर्ड; जिल्हा परिषदेच्या शिरपेच्यात आणखी दोन मानाचे तुरे

दिव्य निर्धार वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण व लोककल्याणकारी उपक्रमांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे. मिशन बाल भरारी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘एआय अंगणवाडी’ आणि ‘दवाखाना आपल्या दारी’ या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांना प्रतिष्ठेचा स्कॉच अवॉर्ड जाहीर झाला आहे. ही जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून, जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे खोवल्य गेले.

नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचा वितरण सोहळा १० जानेवारीला आयोजित करण्यात आला असून, या समारंभात जि.प.सीईओ विनायक महामुनी यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आणि आरोग्य विभागाचे विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गहलोत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्कॉच पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च स्वतंत्र सन्मान मानले जातात. प्रशासन, वित्त, तंत्रज्ञान, सक्षमीकरण आणि नागरिक सेवांच्या क्षेत्रात राष्ट्रीय विकासाला मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था व प्रकल्पांना हे पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार ‘बेंचमार्क’ म्हणून ओळखले जातात. महिला व बाल विकास विभागामार्फत मिशन बाल भरारी अंतर्गत जिल्ह्यातील वडधामना येथे भारतातील पहिली ‘एआय’ अंगणवाडी विकसित करण्यात आली. या उपक्रमाचे देशभरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. वडधामना अंगणवाडीच्या धर्तीवर जिल्ह्यात सुमारे ६० एआय अंगणवाड्या विकसित करण्यात आल्या आहेत. या आधुनिक अंगणवाड्यांमुळे बालकांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळत असून, शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत आहे. परिणामी, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीयरीत्या वाढली आहे.

दवाखाना आपल्या दारी उपक्रमाचीही दखल
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘दवाखाना आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत हजारो नागरिकांची त्यांच्या दारातच आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुलभ झाले. आरोग्यसेवांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमाला यापूर्वीही विविध पुरस्कार प्राप्त झाले असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणा या यशात सक्रियपणे सहभागी आहे. या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गहलोत यांचे कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

सौ. महानंदा केशवराव पाटील : समाजकार्यातून उभारलेले नेतृत्व, विकासाची अखंड धडपड

divyanirdhar

कॉग्रेसला बर्वे तर भाजप-शिवसेनेला पारवेची काळजी; साडे सहा लाख बौद्धांचा वाली कोण?

divyanirdhar

महापारेषण कंपनीकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधी; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

divyanirdhar

उमरेडवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; मुख्याधिकार्‍यांनी केली केंद्राची पाहणी

divyanirdhar