नागपूर ः विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांच्यासमोर जगावे कि मरावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्याचे नेते शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामठी बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांची ठाम धारणा आहे. कृषी कायद्याविषयी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची झालेल्या भेटीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषिकायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा कायदा केला जाणार असून, आगामी पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडले जाईल. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर चर्चा केली. त्यासाठी शेतकऱ्याचे प्रतिनिधी हुकुमचंद आमधरे यांनी आभार मानले. शेतकऱ्यांच्या समस्या विषयी विचार करून शेतकरी हिताचे विधेयक आगामी अधिवेशनात विधेयक मांडणार यासाठी शेतकरी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यांना पीक पेरणीच्या वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होते. जेव्हा पीक हातात येते तेव्हा पिकाला भाव नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
यावर्षी शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात आली. पण त्यांना घोषित केलेले बोनस त्यांच्या खात्यात आज पर्यंत टाकण्यात आलेले नाही.रब्बी धान खरेदी आज पर्यंत सुरू करण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्याची धावपळ होत आहे.
विदर्भातील शेतकरी कोरोना महामारीमुळे हवालदिल झाला आहे. मदतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री व सहकारमंत्री यासह कोणीही दौरा केलेला नाही. अनेक कोरोनाग्रस्त शेतकरी उपचार न झाल्याने त्यांचे निधन झाले. कोरोनायोद्धांना मिळणारी मदत यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना या कोरोना काळात बहुतांश संकटांना सामोरे जावे लागले. या वर्षी शेतमालाचे झालेले नुकसान व त्यात कोरोना महामारीमुळे शेतकरी हे हताश झालेले आहेत. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या कडे लक्ष द्यावे, अशी मागणीही मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कामठी बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे.