Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी खेळातून प्रगती साधावी ः कामगार उपायुक्त एम.पी. मडावी

गडचिरोली ः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवकांपुढे करियरच्या अनेक समस्या असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी अनेक मार्ग आहे. क्रीडा क्षेत्रात कर्तबगारी करून आपले करिअर आणि प्रगती साधावी, असे आवाहन नागपूर विभागीय कार्यालयातील कामगार उपायुक्त एम.पी. मडावी यांनी केले.

मवेली येथे भूम हिरयल तादो क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामीण कबड्डी आणि व्हॉलिबॉल सामन्याच्या उद्गघाटन प्रसंगी बोलत होते.

उद्घाटनीय कार्यक्रमाला एम.पी. मडावी, शिवराम कुमरे, प्रा. मंगेश कुमरे, तालुका कृषी अधिकारी दमाहे, तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी एच. के. राऊत. शिक्षक एम.बी. मडावी, आदिवासी समाजसेवक नंदू नैताम उपस्थित होते. उद्घाटन पेकाजी महारू मट्टामी यांनी केले. तर अध्यक्षस्थानी फकिरा बाजू मट्टामी होते.

कामगार उपायुक्त मडावी म्हणाले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण आणि करिअरचे मोठे आव्हान आहे. मात्र, आदिवासी युवकांमध्ये मेहनत करण्याची उपजत गुण असल्यामुळे त्यांनी बारकाईने आणि मेहनतीने थोडे लक्ष दिल्यास त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. कारण येणाऱ्या काळात युवकांसाठी भरपूर संधी आहे. जास्तीतजास्त युवकांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे, सोबत विविध क्रीडा प्रकारात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी, असेही श्री. मडावी म्हणाले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. त्यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.

कबड्डी आणि व्हॉलीबाल स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. मंडळाचे अध्यक्ष मोहन मटामी, लिंगेश मटामी, संजय मटामी, शिवाडी मटामी, किशोर मटामी, नरेश पुडो, सूरज मटामी, अनिल मडावी, मंकेश्वर मडकाम, वैभव मडावी, स्नेहलकुमार मडावी यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

वकिली व्यवसाय नाही तर लढण्याचे शस्र; ॲड. सोनिया अमृत गजभिये ह्या वकिली व्यवसायात शिखरावर

divyanirdhar

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईबने उचलला विडा

divyanirdhar

जीएसटी परिषदेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल

divyanirdhar

बाबासाहेब ः केदार ते सहकार

divyanirdhar