Divya Nirdhar
Breaking News
आंतरराष्ट्रीयठळक बातम्याभारतराजकीयविदर्भ

बहुजन मुक्ती आंदोलन संघटनेचे धरणे आंदोलन

नागपूर ः येथील तहसील कार्यालय समोर बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेतर्फे जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात धरणे आंदोलन नुकतेच करण्यात आले. नायब तहसीलदार जवंजाळ यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरे यांनी केले. तर संघटनेचे राष्ट्रीय महासचिव महेंद्र सातपुते, बाबा कोठे, क्रांती मीनल, संगीत बाबू इंगळे, पंकज गायकवाड, विजय घाटोळ, पत्रकार युवराज मेश्राम, संजय चौधरी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात वेगळा विदर्भ राज्य निर्माण करणे,ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, राजस्थान येथील इंद्रकुमार मेघवाल विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा झालेल्या पिकांची नुकसानभरपाई हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यात औद्योगिक कामगारांना नियमानुसार वेतन व इतर सोयी सुविधा नियमित न देणाऱ्या कारखानदारांवर सहा महिन्याची तुरुंगवास शिक्षेची तरतूद, कामगार कायद्यात करण्यात यावी ,काटोल तालुक्यातील कोंढाळी गावातील शासकीय दुकान गाडे मध्ये सुरू असलेले देशी दारूचे दुकान त्वरित बंद करण्यात या, मागण्याचा समावेश होता. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश डोंगरे यांचे भाषण झाले.त्यांना सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. मागण्या मान्य केल्या नाही तर जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात प्रेमकुमार सोमकुंवर, बाबाराव वाघमारे, मंगला दुर्गे, बाबाराव कडू ,अर्णव गायकवाड ,लक्ष्मी शेंडे ,भगवान गायकवाड, राजीव बांगर ,आशा मेंढे, जीवन बागडे ,रामदास हिवराळे ,लता जाधव, नथुजी तागडे, प्रवीण वानखेडे ,बंडूभाऊ शेंडे, हेमराज ढवळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

divyanirdhar

धोबी सर्वभाषिक महासंघाची कार्यकारिणी जाहीर; डी.डी. सोनटक्के यांनी पदाधिकाऱ्यांना दिले नियुक्तीपत्र

divyanirdhar

पासपोर्टच्या धर्तीवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; बार्टीने सादर केला सामाजिक न्याय विभागाला प्रस्ताव

divyanirdhar

सुबोध मोहिते : राजकारणातील दुर्लक्षित हिरा

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar

रिटायर्ड आर्मी ऑफिसर अविनाश मेश्राम मागासवर्गातील युवकांना देतोय ऍथलेटिक होण्याचे मोफत धडे !

divyanirdhar