Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूर

वरिष्ठ शिक्षिका सरिता प्रबोध धोंगडे यांना सर्वोत्तम शिक्षक सन्मान

नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक महिलांचा सन्मान करण्यात आला. वरिष्ठ शिक्षिका सरिता प्रबोध धोंगडे यांना सर्वोत्तम शिक्षक सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक प्रवीण मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे आयुक्त धनंजय वंजारी, समाजकल्याण विभाग चंद्रपूरचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड,गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर (सावनेर) आणि मनोज पाटील (उमरेड) उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून नॅशनल यूथ क्लबच्या अध्यक्षा सिमरन थूल यांनी मार्गदर्शन केले. महिला दिनानिमित्त जवाहर विद्यार्थी सभागृह, कुकडे लेआउट येथे कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सरिता धोंगडे शिक्षिका पेशात असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श शिक्षिका म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

divyanirdhar

विधान भवन परिसरात स्टॉलचे वाटप करताना ‘आठवलें’चा प्रताप

divyanirdhar

सरपंच जयश्री इंगोले यांच्या खसाळ्यात उमलली ‘समृद्ध पंचायत’ची पहाट

divyanirdhar

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

जिल्हा परिषदेचा दावा फोल, पाणीटंचाईची कामे अपूर्णच

divyanirdhar

पदोन्नतीतील आरक्षण समितीला मुदतवाढ म्हणजे शासनाचे वेळकाढूपणाचे धोरण; शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांचा घणाघात

divyanirdhar