Divya Nirdhar
Breaking News
ramrek
गुन्हाठळक बातम्यानागपूरमुंबई

साहेब फक्त नागपूर ग्रामीण वाहतूक पोलिसांची भीती वाटतेजी, रामटेक–तुमसर महामार्गावर वाहनचालकांचा तपासण्यांच्या ससेमिऱ्यामुळे त्रास?

रुपेश वनवे : दिव्य निर्धार वृत्तसेवा
शिवणी भोंडकी  (रामटेक ): रामटेकवरून तुमसरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मार्गात विविध ठिकाणी पोलिस तपासण्यांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागपूर ग्रामीण, रामटेक वाहतूक पोलीस, अरोली पोलीस, आंधळगाव पोलीस, तुमसर पोलीस तसेच भंडारा ग्रामीण पोलीस यांच्या हद्दीतून प्रवास करताना वारंवार तपासणी होत असल्याचा अनुभव काही वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.

रामटेक तालुक्यातील सामान्य जनतेला रामटेक हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तहसील कार्यालय,कॉलेज भाजी मंडी, येथे जावे लागते,,खिंडसी तलाव जवळ तसेच शिवनी भोंडकी किरणापूर जवळ नागपूर ग्रामीण पोलीस यांचा नेहमी सामना करावा लागतो,, पण काही पोलीस अधिकारी नाहक परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचे समोर येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असले, तरी प्रत्येक ठिकाणी तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांना अनावश्यक वेळ थांबवून ठेवले जात असल्यास त्याचा प्रवाशांना त्रास होतो. विशेषतः कामानिमित्त, वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक प्रवास करणाऱ्या नागरिकांना अशा तपासण्यांमुळे विलंब सहन करावा लागू शकतो, अशी तक्रार आहे.

साहेब फक्त भीती नागपूर ग्रामीण पोलिसांची लागते बाकी कुणाची नाही,नियमांची अंमलबजावणी करा; मात्र नागरिकांना नाहक त्रास देऊ नका,” अशी भूमिका काही वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. तपासणीदरम्यान कागदपत्रे, वाहनाची स्थिती किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन याबाबत स्पष्ट कारण सांगण्यात यावे. तसेच दंड आकारताना अधिकृत पावती देण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. दरम्यान, महामार्गावरील अपघात रोखणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे तपासणीला विरोध नसून, तपासणीची पद्धत, पारदर्शकता आणि नागरिकांशी होणारे वर्तन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या मार्गावरील विविध पोलिस हद्दींमध्ये होणाऱ्या तपासण्यांचा आढावा घेऊन नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच तक्रारी असल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित पोस्ट

नागनदीसह अनेक नाल्यांवर सुरक्षा भिंत नाही;बालक वाहून गेल्यानंतरही महापालिका झोपेतच

divyanirdhar

माझ्याबाजूने मनभेद नाही, त्यांच्या बाजूचे माहीत नाही… उपसभापती नीलम गोऱ्हे

divyanirdhar

रामटेकच्या विकासासाठी किशोर गजभियेंना मतदान करा; प्रचार सभेत नेत्यांनी केले आवाहन

divyanirdhar

अखेर वनक्षेत्रपालांना पदोन्नतीचे आदेश : कास्ट्राईब संघटनेच्या आंदोलनाला यश

divyanirdhar

चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार

divyanirdhar

ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मा. कांशीरामजी यांची कॉपी केली : नवनियुक्त बसपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार

divyanirdhar