Divya Nirdhar
Breaking News
आंतरराष्ट्रीयऔरंगाबादकरमणूकखेळठळक बातम्यानागपूरपुणेबिझनेसभारतमुंबईराजकीयराष्ट्रीयरोजगारविदर्भ

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवेंवर निघणार टपाल तिकीट; बार्टीने केंद्र सरकारला पाठविला प्रस्ताव

नागपूर, ः मांग-मातंग समाजाचे आद्य गुरू लुहजी साळवे यांच्यावर बार्टी टपाल तिकीट काढणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यासोबत मातंग समाजाच्या विकासासाठी विशेष आराखडाही तयार करण्यात आला. यात ५ लाख युवकांना उद्योजकता विकास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. बार्टीच्या योजनांमुळे समाज मुख्य प्रवाहात येत असून मांग-मातंग समाजाच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मातंग समाजाच्या आद्य गुरू लहुजी साळवे यांच्यावर डाक तिकीट काढण्यात येणार आहे. सोबतच मांग- मातंग समाजाच्या विकासासाठी कृती आराखडाही मंजूर करण्यात आला आहे. आद्यक्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे आणि मुक्ता साळवे यांच्या कार्यावर संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे मांग-मातंग समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन जातप्रमाणपत्र शिबिर घेण्यात येतील. उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत ५० हजार गट स्थापन करून ५ लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल.
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल ठिकाणी ४ महिन्याच्या कालावधीचे निःशुल्क मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले आहे. आतापर्यंत १ हजार ७०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. १९३ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. यावर्षी निवासी प्रशिक्षणात ५० युवकांचा समावेश केला आहे. या व्यतिरिक्त बार्टी संस्थेमार्फत आगामी पोलिस भरतीच्या अनुषंगाने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ६ महिने कालावधीचे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविली आहे. आतापर्यंत मांग-मातंग समाजातील जवळपास ११५ विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपचा लाभ मिळाला आहे. तसेच निवड प्रक्रियेमध्ये मांग-मातंग समाजातील एकूण ८५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

१३ मातंग परिषदांवर होणार अभ्यास
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० ते १९४५ या दरम्यान १३ मातंग परिषदा घेतल्या होत्या.त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात येत आहे. या यातून मांग-मातंग समाजाच्या विकासासाठी विशेष योजना करण्यात येणार आहे. बाबासाहेबांचे मांग-मातंग समाजाबद्दल असलेल्या जिव्हाळ्याबद्दल अभ्यास करण्यात येणार आहे.

मांग-मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत अनेक योजना त्यांच्यासाठी राबविण्यात आल्या आहेत. आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे यांच्यावर टपाल तिकीट काढणे हे समाजासाठी भूषणावह आहे. केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकर टपाट तिकीट प्रकाशित करण्यात येईल.
धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद निवडणुकीत मागासवर्गीयांची मते कॉंग्रेसलाच मिळतील; अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांचे भाकीत

divyanirdhar

आशा स्वयंसेविकांनी घेतली ‘मनसे’ कडे मदतीची धाव, मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांना दिले निवेदन

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी कास्ट्राईबने उचलला विडा

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar

माजी मंत्री रमेश बंग गरजले, म्हणाले, पेट्रोलचे भाव कमी करा नाही तर खूर्ची खाली करा…

divyanirdhar

चंद्रपुरात तस्कराने तोडले रेल्वे फाटक…

divyanirdhar