दिव्य निर्धार/ प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान नागपूर दौऱ्यावर असून आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर रविवारी सकाळी दहा वाजता दैनिक भास्कर तर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. रविवारी दुपारी सव्वा अकरा वाजता अंबाझरी रोड वरील ब्लाईड रिलिफ असोशिएशन कार्यक्रमात ते पुन्हा सहभागी होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 14 जूनला ते परत मुंबई येथे रवाना होतील.