



नागपूर : नागपुरात जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी मतदान होत आहे. हळूहळू निकालाचे कल हाती येत आहेत. आतापर्यंत ९ जागांचे कल हाती आले असून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची आघाडी दिसतेय. सध्या ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच २ जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचे भाजपचे सर्वात महत्वाचे उमेदवार अनिल निधान यांचा गुमथळा गटातून पराभव झाला आहे. त्यामुळे हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
अनिल निदान हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. ते गुमथळा गटातून निवडणूक लढवित होते. ते भाजप समर्थित उमेदवार होते. मात्र, काँग्रेसच्या दिनेश ढोले यांनी दणदणीत विजय मिळवून निदान यांचा पराभव केला आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ६ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला असून फक्त एका जागेवर भाजपला विजय मिळविता आला आहे. भाजपच्या मिनाक्षी सरोदे यांचा २४०० मतांनी विजय झाला आहे.
हिंगणा तालुक्यातील निलडोह-वडधामना जि.प. गटातून काँग्रेसच्या संजय जगताप यांचा ५७४६ विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या राजेंद्र हरडे यांना पराभूत केले आहे. कुंदा राऊत या देखील विजयी झाल्या आहेत.
नागपूर जिल्हा परिषदेतील आतापर्यंत विजयी उमेदवार –
– हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)
मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)
काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)
कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)
नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)
रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )
कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)
काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)
पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)
राजोला अरुण हटवार (कॉंग्रेस)
- आधी भाजपचा विजय, १० मिनिटांनी काँग्रेसच्या उमेदवाराची बाजी
नागपूरसह काही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी आज सुरु असून काही धक्कादायक असे निकालही हाती येत आहेत. नागपूरमध्ये नगरखेड पंचायत समितीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. तर दवलामेटीमध्ये सुरुवातीला भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं सांगितलं गेलं आणि १० मिनिटांनी निकाल बदलल्याचं समोर आलं. यात काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारत १० मतांनी निवडणूक जिंकली.
दवलामेटीमध्ये अटीतटीची अशी लढत झाली. यामध्ये काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी अवघ्या १० मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या ममता जैस्वाल यांना पराभूत केलं. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितच्या मंगला कांबळे या राहिल्या.
सुलोचना ढोक आणि ममता जैस्वाल यांच्यात काट्याची टक्कर सुरु होती. यातच सुरुवातीला भाजपच्या ममता जैस्वाल जिंकल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र दहा मिनिटांनी काँग्रेसच्या सुलोचना ढोक विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
काँग्रेसच्या विजयी उमेदवार सुलोचना ढोक यांना २१६१ मते मिळाली. भाजपच्या ममता जैस्वाल यांना २१५१ मते मिळाल्यानं त्यांचा निसटता पराभव झाला. तर वंचितच्या उमेदवार मंगला कांबळे यांनी २ हजार ६४ मते मिळवली.
राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूरसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नगरखेड पंचायत समितीत भाजपने बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. याआधी नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ती भाजपने हिसकावली आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूरसह पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला असून नगरखेड पंचायत समितीत भाजपने बाजी मारली आहे.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील नगरखेडा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. याआधी नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ती भाजपने हिसकावली आहे.