Divya Nirdhar
Breaking News
औरंगाबादठळक बातम्यानागपूरपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीयराष्ट्रीयविदर्भ

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

गावातील राजकारण भल्याभल्यांना जमत नाही. मात्र, काही लोकांना ते सहज जमते. गावातील प्रत्येक माणूस आपला आणि आपण त्यांच्यासाठीच आपले आयुष्य वेचायचे हे जर मनात आणले तर काहीही अशक्य नाही, हे एका गावातील २१ वर्षांच्या युवकांने दाखवून दिले. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला युवक जेव्हा राजकारणामध्ये स्वतःचे नाव कमवितो, यापेक्षा त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण योग कोणता?. रनाळा येथील गोंविदराव आमधरे यांचे कुटुंब. तीन भाऊ. गोंविदराव आमधरे हे शेती करायचे. गावातील प्रतिष्ठीत कुटुंब म्हणून त्यांचे सर्वत्र ओळख. गावातील प्रत्येकाला मदत करण्याच्या सवयीमुळे रनाळा येथील आमधरे कुटुंब प्रसिद्ध होते. घरातील कोणताही आला तरी उपाशापोटी जात नव्हता. या कुटुंबात गोंविदराव आणि आई शेवंता यांच्या पोटी एका बाळाचा जन्म २९ सप्टेंबर १९५६ रोजी झाला. आमधरे यांच्या कुटुंबात जन्म झाला. नावही त्यांना शोभेल असे त्यांच्या आईवडिलांनी ठेवले. हुकुमचंद. हुकुमचंद गोंविदराव आमधरे. हुकुमचंद यांना लहानपणापासून लोकांत जावून मिसळण्याची आणि लहानमोठ्यांना मदत करण्याची आवड होती. जेमतेम शिक्षण सुरू असताना त्यांनी सामाजिक कार्यालत उडी घेतली. गावातील कोणतीही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम असला की हुकुमचंद आमधरे यांची हजेरी असायची. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे गावातील प्रत्त्येकांच्या तोंडी त्यांचे नाव होते. जाती-धर्म यापलिकडे ते काम करू लागले. त्यामुळे रनाळा येथील युवक लोकांसाठी काम करतो आणि समस्या सोडवितो ही माहिती जवळच्या गावात पसरू लागली. हुकुमचंद आमधरे यांना २१ वर्षी गावाच्या राजकारणात गावातील लोकांनीच उतरविले. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडूण आल्यानंतर त्यांना भिलगाव-रनाळा गावाचा सरपंच होण्याचा बहुमानही मिळाला. त्यांच्या आयुष्यातील ही मोठी कलाटणी होती. घरात शेती होतीच. शेतकरीपूत्र म्हणून त्यांची ओळख झाली. आणि शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता, अशी जर कोणाची आयुष्याच्या शेवट्या क्षणापर्यंत ओळख राहत असेल तर यापेक्षा कोणते भाग्य. हुकुमचंद आमधरे यांच्या वाट्याला हे भाग्य लाभले. घरात २२ एकर शेती असली तरी खाणारी तोंडे भरपूर होती. हुकुमचंद यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ, असा सात जणांची त्यांची भाऊबंधकी. आईवडिलांची शिकवण त्यांच्या अंगी होती. त्यामुळे एक छोटशा खेड्यात सामान्य शेतकरी कुटुंबातील आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊनही आयुष्यभर त्यांनी दिलेल्या शिकवणीवर ठाम राहून कार्य करण्याचे धाडस फार कमी लोकांच्या अंगी असते. ते धाडस हुकुमचंद आमधरे यांनी केले.

२१ व्या वर्षी राजकारणात आल्यानंतर त्यांनी कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे करण्याचा सपाटा सुरू केला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न अविरत सुरू होते. राजकारणात आल्यानंतर बरेच युवक शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी बी.कॉम. बीपीएड. पर्यंत शिक्षण घेतले. स्वतःही शिकले. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करून गावातील युवकांनी शिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्यांच्या गावातील बरेच युवक त्या काळात शिक्षण घेऊन नोकरीला लागते. २१ वर्षांपेक्षा अधिक काळ ते भिलगाव-रनाळा गावाचे सरपंच होते. एवढा विश्वास लोक कोणावरही टाकत नाही. मात्र, त्यांच्यावर गावकऱ्यांनी विश्वास टाकला. त्यांनी हुकुमचंद आमधरे यांनी तो विश्वास सार्थकी लावला. गावात झपाट्याने त्यांनी विकास केला. प्रत्येकांचे प्रश्न जातीने सोडवू लागते. शेतकऱ्यांचे प्रश्न तर त्यांच्यासाठी जीव की प्राण. त्यांच्या प्रश्नांवर कोणासोबतही दोन हात करण्याचे धाडस ते करीत होते.

२१ वर्षे सरपंच पद भिलगाव आणि रनाळा ग्रामपंचायतीचे भूषविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिकत असताना त्यांना विद्यार्थी कॉग्रेस प्रवेश केला आणि काम सुरू केले. तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करू लागले. सहकार क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर आशीया खंडातील सर्वांत मोठ्या बाजार समितीचे ते उपसभापती झाले. राजकारणात काम करताना कोणाचा तरी आधार लागतो. राजकीय घराणे लागते. मात्र, या दोन्ही गोष्टी आमधरे यांच्याकडे नव्हत्या तरी, स्वबळावार त्यांनी अनेक संस्थामध्ये स्वतःचे अस्तित्व जपले. त्याप्रमाणे स्वकष्टाने निर्माण केलेली राजकीय प्रतिष्ठा कायम ठेवली. राजकारणात स्वच्छ प्रतिमा जपणे म्हणजे मोठे जिकरीचे काम आहे. अनेक लोकांची कामे करून चारित्र्यावर कोणत्याही छितोंडे उडू दिले नाही. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. विद्यार्थी दशेपासून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. नाशीकराव तिरपुडे आणि बाबासाहेब केदार हे त्यांच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील गुरू आहे. नाशिकराव तिरपुडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी सोडून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यावेळी नाशीकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वात त्यांनी दिल्ली येथे इंदिरा गांधी यांची भेट घेऊन खंबीरपणे पक्ष आणि त्यांच्यासोबत उभे असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात आल्यापासून ते क़ॉंग्रेसचे पदाधिकारी आहे. पक्षाला कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी पक्षाकडे कधीच पाठ फिरविली नाही.

सहकार क्षेत्रात काम करताना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यावर त्यांनी नेहमीच भर दिला. नागपूर बाजार समितीचे उपसभापती असताना त्यांच्यातील शेतकऱ्याप्रती असलेली कणव बाबासाहेब केदार यांनी हेरली आणि त्यांना सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कामठी बाजार समितीची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी ते सभापती काम पाहिले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केले. तसेच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला. आज, ते विदर्भातून मुंबई बाजार समितीवर निवडून गेले. सभापती नियमन म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी वेळोवेळी सहकारमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल त्यांना जाणीव करून दिली. शेतकऱ्यांच्या बाबात ते फार संवेदनशील आहेत.

राजकीय इतिहास फार मोठा आहे. अध्यक्ष, ब्लॉक युवक काँग्रेस 1975-1980, कार्यकारिणी सदस्य, जिल्हा काँग्रेस 1978-1992, सरचिटणीस, जिल्हा युवक काँग्रेस-ग्रामीण-1981-87. सरचिटणीस, विदर्भ प्रदेश युवक काँग्रेस 1988-1989, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस 1988-1989, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल 1993 पासून, अध्यक्ष, नागपूर जिल्हा काँग्रेस सेवादल 1995- 2003, सरचिटणीस, नागपूर जि. काँग्रेस (ग्रामीण) कडून 2001. सचिव, कामगार सेल MPCC. सरचिटणीस, MPCC 2008 पासून. 11. विशेष निमंत्रित, अखिल भारतीय INTUC कार्यकारिणी, 2007 पासून नवी दिल्ली, उपाध्यक्ष – नागपूर जि. कृषी  औद्योगिक कॉर्पोरेशन फेडरेशन, नागपूर गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत.

राजकारणातील प्रतिष्टीत व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कामठी तालुकाच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी पक्ष बांधणाकरिता प्रयत्न केले आहे. कामठी, मौदा तालुक्यातील शेतकऱ्यासोबत संवाद आहे. हुकुमचंद आमधरे हे प्रामाणिक व्यक्तीमत्व असून अनेकांना वेळावेळी मदत करणारे सामान्य माणसांचा नेता आहेत. सध्या राजकारणात नेत्यांचा दुष्काळ असताना स्वतःची राजकीय प्रतिष्टा जपून लोकांची कामे करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारणाती बड्या नेत्यांसोबत त्यांनी उठबस आहे. माजी मंत्री आणि आमदार सुनील केदार, माजी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांच्यासह कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे.  त्याप्रमाणे सहकार आणि राजकारणातील अनेक प्रस्थ त्यांचा सल्ला घेतात. सहकार क्षेत्राचा अभ्यास असलेले विदर्भातील जेष्ठ नेते आहेत. आज, हुकुमचंद गोविंदराव आमधरे सर यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त ह्दयपासून शुभेच्छा. येणारा काळ त्याच्यासाठी आरोग्यवर्धक आणि आनंदायी राहावे ही प्रार्थना.

(दिव्य निर्धारचे हे स्वतःचे क्रियेशन आहे… वापरू नये)

संबंधित पोस्ट

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

divyanirdhar

शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी सामाजिक न्यायाचे सुमंत भांगे आक्रमक;आठवड्याला दिले बैठकीचे आदेश

divyanirdhar

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात, विकासाची जबाबदारी स्विकारा

divyanirdhar

राजानंद कावळे : मृत्यूशय्येवरील रुग्णांना मदतीचा हात देणारा देवदूत

divyanirdhar

आमदार राजू पारवे यांच्या हस्ते कुही तालुक्यात विविध कामाचे भूमिपूजन

divyanirdhar

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

divyanirdhar