Divya Nirdhar
Breaking News
Chandrashekhar-Bawankule.jpg
नागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीय

स्थानिकमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंला पुन्हा हुलकावणी?, मोहभंग होण्याची शक्यता

नागपूर : विदर्भातील अनेक आमदारांना निवडूण आणण्याची क्षमता असणारे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आमदारकीपासून दूर राहण्याचे दिवस आले. कामठी मतदारसंघात नेहमी एकहाती सत्ता मिळविणारे बावनकुळे यांचा ऐनवेळी पत्ता कट करण्यात आला. त्याचे पंख छाटण्याचे कामही पक्षातून झाल्याची चर्चा आहे. आत्ता नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. मात्र, तिथेही त्यांना हुलकाणी मिळते काय, असा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे. तर कॉंग्रेसही सुनील केदार यांच्या माध्यमातून जागा खेचून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणूकीविषयी भाजपात सहसा काय होईल कोणी सांगत नाही. त्याविषयी ठोस माहिती कोणीच बोलत नाही. भाजपच्या बड्या नेत्यांनाच ते माहीत असावे. त्याशिवाय कोणाला माहीत असले तरी कोणी उघडपणे बोलण्याचे धाडस करीत नाही. मध्यंतरी भाजपने शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना विधान परिषदेत पाठविले. त्यावेळीसुद्धा बावनकुळे यांच्या नावाची चर्चा होती. त्या संदर्भात दिल्ली वाऱ्याही त्यांनी केल्या होत्या. मात्र, वरिष्ठांनी फुली मारली. भाजपची सत्ता नसल्याने राज्यपाल नियुक्त कोट्यांमध्येही त्यांचा समावेश होणे अवघड आहे.

माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा सक्रिय झाले असून नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, ज्या कारणासाठी कामठी विधानसभा मतदारसंघाची त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती ते प्रकरण अद्याप गुलदस्त्यात असल्याने सर्वच साशंक आहेत.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार गिरीश व्यास यांची जागा रिक्त होत आहे. ते बिनविरोध निवडून आले होते. यावेळी निवडणूक होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा परिषद भाजपने गमावली आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात भाजपचे फक्त दोनच आमदार आहेत. त्यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला सर्वच दृष्टीने ‘तगडा‘ उमेदवार द्यावा लागणार आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास बावनकुळे यांना उमेदवारी मिळवणे आणखीच अवघड ठरेल असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

भाजपच्या कार्यकाळात बावनकुळे पाच वर्षे ऊर्जामंत्री होते. याशिवाय अबकारी खाते देऊन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना करण्यात आले होते. भंडारा आणि वर्धा जिल्ह्याचेही काही वर्षे ते प्रभारी पालकमंत्री होते. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही ते लोकप्रिय होते. कामठी विधानसभा मतदारसंघातून हमखास निवडून येण्याची त्यांची खात्री होती. सर्व काही आलबेल असताना त्यांचे वरिष्ठांसोबत बिनसले. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना प्रतीक्षा करायला लावली. शेवटचा एक तास शिल्लक असताना त्यांना डावलून सावरकर यांना उमेदवारी दिली. बावनकुळे यांचे कोणासोबत बिनसले, त्यांचे तिकीट कोणी कापले, त्याची कारणे काय हे अद्याप कोणालाच उमगले नाही. स्वतः बावनकुळे या विषयावर बोलण्यास तयार नाहीत.

संबंधित पोस्ट

1600 कोटी खर्च येणार, 10 एकरात सेंटर; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

divyanirdhar

मनपाच्या लाचखोर लिपिकाला अटक; १० हजारांची मागितली लाच

divyanirdhar

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी माजी मंत्री सुबोध मोहिते मैदानात; म्हणाले, स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना संधी

divyanirdhar

काँग्रेसमध्ये धुसफूस, नवा गडी नवा राज

divyanirdhar

सुबोध मोहिते : राजकारणातील दुर्लक्षित हिरा

divyanirdhar

मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

divyanirdhar