Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

येणार तर कमळच, भाजप युवा नेते चंद्रशेखर राऊत यांचा दावा

दिव्य निर्धार ः वृत्तसेवा
नागपूर ः राजकारणातील सारीपाटावर विरोधकांना नेहमी मात देणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा झंझावाती प्रचार सुरू असून गावागावांत लोकांना भेटी देत आहेत. यामुळे त्यांच्या प्रचाराच्या धडाक्यात कामठी विधानसभा मतदारसंघात कमळच फुलणार असल्याचा दावा भाजपचे युवा नेते आणि उमरगावचे उपसरपंच चंद्रशेखर राऊत यांनी केला आहे.
कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक लढवित असून त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. गावागावांत ते भेटी देत आहे. गावातील लोकांची विचारपूस करून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहे. त्याप्रमाणे दिवाळीच्या शुभेच्छा देत असून त्यांना विकास करण्याचे आश्वासन देत आहे. कामठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना लोकांची सेवा करण्याच्या सूचना देत आहे. प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी प्रचारासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही चंद्रशेखर राऊत यांनी केले आहे. कामठी मतदारसंघातील भाजपचा विजय म्हणजे राज्याचा विजय आहे. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून संपूर्ण राज्यातील निवडणुकीची जबाबदारी ही त्यांच्यावर आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हात मजबूत करून त्यांना बहुमतांनी निवडून द्यावे. कामठी, नागपूर ग्रामीण आणि मौदा तालुक्याच्या विकासासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेब निवडून येणे गरजेचे असून त्याच्यामुळे तिन्ही तालु्क्याचा विकास झपाट्याने होणार आहे. नागपूर ग्रामीणमधील अनेक गावांचा विकास त्यांनी केला आहे. आणखी विकास करण्याची गरज आहे. याकरिता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे युवा नेते व उमरगावच्या विकासाचे शिल्पकार चंद्रशेखर राऊत यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

मायबाप सरकार तुम्हीच सांगा, नदी नाल्याने वेढलेली शेतजमिनी कसायची कशी?

divyanirdhar

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

divyanirdhar

ग़डचिरोली: लसीकरणासाठी मंत्री वडेट्टीवार आग्रही, काय म्हणाले वाचा…

divyanirdhar

खूप झाले राजकीय आरक्षण… ते बंदच झाले पाहिजे…

divyanirdhar

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नागपुरात आगमन

divyanirdhar

ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते रस्त्यावर

divyanirdhar