Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीय

कामठीच्या विकासासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी करा, भाजपचे चंद्रशेखर राऊत यांचे आवाहन

दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः कामठी विधानसभा मतदारसंघासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या २५ वर्षांत अनेक प्रयत्न केले आहेत. अनेक गावांचा विकास केला आहे. मौदा आणि कामठी, नागपूर ग्रामीण तालुक्यातील विकासासाठी पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेत भरघोस मतांनी पाठवा, असे आवाहन उमरगावचे भाजपचे युवा नेता आणि उमरगावचे उपसरपंच चंद्रशेखर राऊत यांनी केले आहे.
कामठी, मौदा आणि नागपूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राज्याचे माजी मंत्री आणि विकासासाठी अहोरात्र झटणारे नेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणुकीच्या रिगणात आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी कामठी मतदारसंघाच्या विकासासाठी झटत आहेत. अनेक नवीन प्रकल्प त्यांनी मतदारसंघात आणून लोकांचा विकास केला आहे. कामठी, मौदा आणि नागपूर ग्रामीणमध्ये अनेक विकासाची काम करून त्यांनी मतदारसंघाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, यामुळे नरसाळा, बेसा, बेलतरोडी व नागपूर ग्रामीणमध्ये त्यांनी अनेक विकासाची कामे केली. नरसाळा, हुडकेश्वर या गावांना नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत आणून त्या गावाचा चौफेर विकास केला आहे. यापूर्वी नागपूर शहराच्या हद्दीत आलेली गावांचा विकास बघितला तर त्या वस्त्यांमध्ये अनेक विकासाची कामे शिल्लक आहेत. मात्र, नरसाळा, हुडकेश्वर गावांमध्ये त्यांनी विकासाची कामे केली, रस्ते, वीज, गडरलाईनसाठी विशेष निधी दिला. यामुळे या गावातील प्रत्येक रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंटीकरण झाले आहे. तसेच नागपूर ग्रामीणमधील अनेक गावांचा त्यांनी विकास केला असून याकडे त्यांनी जबाबदारीने लक्ष दिले आहे. नागपूर ग्रामीण, कामठी आणि मौदा तालुक्यातील कोट्यधीचा निधी देऊन त्यांनी त्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांनी बहुमताने निवडून देऊन विकासाला पुन्हा गती द्यावी, असे आवाहनही उपसरपंच चंद्रशेखर राऊत यांनी केले.

विकास कामांचा दबदबा
नागपूर ग्रामीण, कामठी आणि मौदा तालुका मिळून कामठी मतदारसंघ बनला आहे. नागपूर ग्रामीणमधील नरसाळा, हुडकेश्वर, पिपळा, बेसा, बलतरोडी, घोगली, बहादुरा, खरबी ही शहराला लागून असलेली गावे. या गावात त्यांना विकासाचा झपाटा लावला. शहरात गेलेल्या नरसाळा, हुडकेश्वर गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. शहरातील अनेक भागाचा विकास झाला नाही, त्याच्या कितीतरी पटीने त्यांनी या भागाचा विकास केला. प्रत्येक ग्रामपंचायत त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. सरपंच पदाची निवडणूक असली तरी ते स्वतः यात लक्ष घालून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विजयी करतात हे विशेष, असेही चंद्रशेखर राऊत म्हणाले.

संबंधित पोस्ट

कॉंग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सहकार्य करा, राहुल घरडे यांनी केले आवाहन

divyanirdhar

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

divyanirdhar

व्यांगाच्या शाळांकडे सरकारचे दुर्लक्ष; सातवा वेतन आयोग नाही; विविध प्रश्न जैसे थे

divyanirdhar

तीन हजारांवर माथाडी कामगारांना साडेपाच कोटींचा बोनस; सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांची माहिती

divyanirdhar

मायबाप सरकार तुम्हीच सांगा, नदी नाल्याने वेढलेली शेतजमिनी कसायची कशी?

divyanirdhar

माझ्याबाजूने मनभेद नाही, त्यांच्या बाजूचे माहीत नाही… उपसभापती नीलम गोऱ्हे

divyanirdhar