मुंबई : कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या ओळखीतील कुटुंबातील लोकांचे निधन झाले. डोळ्यांच्या कडा भिजविणारे वातावरण सर्वत्र असताना अनेकांच्या मदतीला धावला तो राजानंद कावळे नावाचा देवदूत. कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावे, याकरिता त्यांनी रात्रंदिवस केला. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील लोकांना त्यांनी मदत केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.
राजानंद कावळे हे कुही तालुक्यातील सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेले व्यक्तिमत्त्व. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे कुटुंब तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी आहेत. राजानंद यांना लहानपणापासून समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी नोकरी पेशात न जातात त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. गेल्या ३० वर्षापासून ते या क्षेत्रात कार्यरत आहे. काही वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. मात्र, त्यांना अंतर्गत राजकारणाचा फटका बसल्याने ते त्यापासून दूर झाले. मात्र, त्यांनी आपली समाजसेवा सोडली नाही. शेतकरी, कामगार आणि शोषित पीडितांचे प्रश्न त्यांनी लावून धरले. लोकांना अडीअडचणींना मदत करू लागले. लोकांच्या समस्या त्यांच्या समस्या नसून ह्या आपल्या समस्या आहेत, असा विचार करून ते त्या समस्या सोडविण्यासाठी धडपड करू लागले. लोकांच्या समस्या सुटत असल्याने लोकांनीही त्यांच्याकडे एक नव्हे अनेक समस्यांचा पाढा वाचू लागले. लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ लागले. तेव्हा लोकांच्या समस्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे, असे राजानंद कावळे यांना वाटले आणि त्या लोकांच्या समस्या सोडविणे हेच आपले करिअर असल्याचा मनात ठासले. मनात ठरविले असल्यामुळे त्यांच्यासमोर याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कुही, उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील लोकांच्या भेटी घेणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांना समजावून सांगणे. शासकीय कार्यालयात जाणे. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करणे असे त्यांनी कार्य केले. त्यांच्यातील तळमळ बघून अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी सहकार्य करू लागले. त्यांच्याकडून आलेल्या समस्यांना सोडून लागले. त्यामुळे राजानंद कावळे यांचा हुरूप वाढला आणि त्यांचे कार्य जोमाने सुरू ठेवले.
कोरोनाच्या काळात त्यांनी आपली सेवा सुरू ठेवली. गावागावांत जेव्हा रुग्ण दिसू लागले. तेव्हा त्यांनी जनजागृती काम सुरू ठेवले. लोकांना कोरोनाची भीती मनातून काढून टाकण्याचे आवाहन केले. तसेच वेळीच उपचार करण्याचेही सांगितले. परिसरातील दवाखान्यात भेट घेऊन त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याची विनंती केली. अशा भयावह स्थितीमध्ये लोक घराबाहेर पडत नसताना राजानंद कावळे यांनी लोकांना मदत केली. मेडिकल, मेयो, एम्स येथे फोनवरून अधिकाऱ्याशी बोलून त्यांनी परिसरातील रुग्णावर योग्य उपचार करण्याची विनंती केली. त्यामुळे रुग्णावर वेळीच उपचार झाल्याने त्यांचे जीव वाचले. आतापर्यत अशा किती लोकांचे जीव त्यांनी वाचविले आहेत. त्यांच्या या कार्याची अनेकांनी दखल घेतली आहे. लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. कोरोना काळात आपला माणूस दूर जात असताना त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे नवयुवकांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे.
लोकांनी मदत मिळावी म्हणून मी हे सामाजिक कार्य करीत आहेत. लोकांच्या समस्या सोडविणारे लोकप्रतिनिधी आता राहिले नाही. फक्त शो बाजी करून आपण निवडून येतो, असा त्यांचा भ्रम असल्याने ते कर्तव्यापासून दूर जात आहेत. यामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे यावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी आपले कार्य प्रामाणिकपणे केले तर इतर लोकांनी ही सेवा करण्याची गरज पडणार नाही. मात्र देशाचे दुदैव आहे लोकनेते काम करीत नाही.
-राजानंद कावळे