Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूर

समाजातील युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर ः परीट-धोबी समाजामध्ये उपजत उद्योजकांचे गुण आहेत. त्यांनी त्यात प्रगती करून उद्योगशील व्हावे आणि स्वयंरोजगार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज बहुउद्देशीय विकास मंडळ आणि महाराष्ट्र परीट, धोबी, वरठी सर्व भाषिक समाज महासंघाच्या वतीने समाजातील दिव्यागांच्या स्वयंरोजगार कार्यक्रमात बोलत होते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या २१० युवक-युवतींना स्वयंरोजगार साहित्याचे वाटप करण्यात आले. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, धोबी-परीट सर्व भाषिक महासंघाचे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के, आरक्षण समन्वय समितीचे प्रमुख आशीष कदम, रुकेश मोतीकर, सुनील पवार, सचिन कदम, दयाराम हिवरकर, भैय्याजी रोहणकर, अशोकराव क्षीरसागर, माणिक भोस्कर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, समाजातील उद्योजकांनी परंपरागत व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. विजेवर चालणाऱ्या इस्त्रीपेक्षा गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचा वापर केल्यास खर्च कमी येतो. त्यासोबत इतर व्यवसायातही भर टाकावा. यावेळी डी.डी. सोनटक्के यांनी युवकांनी स्वयंरोजगार करण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येकाने संघटित राहून लढा द्यावा,असेही ते म्हणाले. कार्यक्रमासाठी आशीष निंबुरकर,संतोष सवतीरकर, संदीप खेडकर, संजय क्षीरसागर, राजकुमार आवळेकर, निरंजन नाकाडे, मयूर मस्के, उज्ज्वला कामरकर, रत्नमाला सोनटक्के, नंदाताई क्षीरसागर, जयाताई खेडकर, प्रीती निंबूरकर यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक डी.डी. सोनटक्के यांनी केले. तर आभार डॉ. राजेश क्षीरसागर यांनी मानले.

संबंधित पोस्ट

रामटेकच्या विकासासाठी किशोर गजभियेंना मतदान करा; प्रचार सभेत नेत्यांनी केले आवाहन

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

शेतकरी प्रश्नावर कृषी सभापती आमधरे यांनी शरद पवारांकडे का केली विनंती…वाचा

divyanirdhar

हे शैक्षणिक धोरण नव्हे विद्यार्थ्याचे मरण; राजानंद कावळे यांचा आरोप

divyanirdhar

परिटांचे नेते डी.डी. सोनटक्के म्हणाले, संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून न्याय द्या

divyanirdhar

दवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक

divyanirdhar