Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरबिझनेस

राज्य लेखा परीक्षकांची नागपुरात कार्यशाळा; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

नागपूर ः ः महाराष्ट्र स्टेट सर्टिफाईड ऑडिटर्स युनियन व महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक आमदार निवास, सिव्हिल लाईन, नागपूर येथे शनिवार, (ता. ४) राज्यस्तरीय प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून राज्यभरातील लेखा परीक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष लांजेवार यांनी दिली आहे.

कार्यशाळेला सहकार विभागाचे आयुक्त अनिल कवडे, सहनिबंधक तानाजी कवडे, सेवानिवृत्त अतिरिक्त उपआयुक्त एस. बी. पाटील,उमेश देवकर,श्रीकांत चौगुले उपस्थित राहणार आहेत. राज्य ऑडिटर्स कौन्सिल अॅण्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के व पदाधिकारी सहकार चळवळ सबळ होण्याचे दृष्टीने प्रचार, प्रसार या मुख्य हेतुने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेला नागपूर जिल्हा सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या शैक्षणिक कार्यशाळेला विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अनेक शासकीय सहकारी निबंधक व विशेष लेखापरीक्षक उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाला उपस्थित लेखापरीक्षकांनी प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहावे,असे आवाहन संतोष लांजेवार यांनी केले आहे. कार्यशाळेत ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर सहकारी कायद्यातील बदल,पतसंस्था आदर्श लेखापरीक्षण मसुदा/अहवाल मार्गदर्शन, सहकारी संस्था नियामक मंडळ व सहकारी निवडणूक प्राधिकरण, लेखापरीक्षण करताना येणाऱ्या अडचणी व प्रश्नोत्तर चर्चा सत्र, यावर चर्चा करण्यात येईल,असेही श्री. लांजेवार यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

चंद्रपुरात तस्कराने तोडले रेल्वे फाटक…

divyanirdhar

 घोटाळ्यात मनपा अधिकार्‍यांच्या सहभागाची शंका, राकाँच्या प्रदेश सचिव आभा पांडे यांचा आरोप

divyanirdhar

शिक्षकांनी ६ हजारांत घर कसे चालवायचे…राजानंद कावळे यांचा प्रश्न

divyanirdhar

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रम, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा पुढाकार

divyanirdhar

भाजप केला आरोग्य सेवक, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

divyanirdhar

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात, विकासाची जबाबदारी स्विकारा

divyanirdhar