दिव्य निर्धार प्रतिनिधी
नागपूर ः देशात मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांच्या नेतृत्वात संसदेवर हल्ला बोल आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहे. हे आंदोलन यशस्वी करून दाखवू, असा दावाही कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात गुरुवारी, 12 ऑगस्ट,2021 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत जंतर मंतर, दिल्ली येथे मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात संसदेवर हल्ला बोल आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते सहभाग होणार आहे. नागपूर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार असून त्यांनी रेल्वे आरक्षण केले आहे. नागपूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते रवाना झाल्याचा दावाही जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केला आहे. प्रदेश अध्यक्ष विजय अंभारे यांना राज्यातील कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशातील मागासवर्गीयांवर मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील मागासवर्गीय बांधव नाराज असून केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालीत असल्याचा आरोप राहुल घरडे यांनी केला आहे.