Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

माजी मंत्री रमेश बंग गरजले, म्हणाले, पेट्रोलचे भाव कमी करा नाही तर खूर्ची खाली करा…

प्रतिनिधी/दिव्य निर्धार
नागपूर. ः महाराष्ट्र राज्याजे माजी मंत्रा रमेश बंग गरजले. त्यांनी पेट्रोल़, डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान मोदीवर चौफेर हल्ला केला. म्हणाले दरवाढ कमी करा नाही तर खुर्ची खाली करा. राष्ट्रवादीच्या वतीने मोदी यांना पत्र पाठविण्यात आले.

नित्याने वाढणाऱ्या पेट्रोल डिझेल, व घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर कमी करा. या आशयाचे निवेदन हिंगणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग व माजी आमदार विजय घोडमारे (पाटील ) यांच्या नेतृत्वात तहसीलदार संतोष खांडरे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.
पेट्रोल-डिझेलच्या वाढता दरामुळे महागाईचा आलेख दिवसेंदिवस चढत आहे आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला सामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे होरपडून निघत आहे. तेव्हा केंद्र शासनाने पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात आणून वाढती महागाई कमी करून जनतेची होणारी लूट थांबवावी तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गृहिणींचा आर्थिक बजेट विस्कटले आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा देण्याकरिता गॅस सिलेंडरचे भाव तातडीने कमी करावे व युपीए शासनाच्या काळात मिळणारी गॅस सिलेंडरची सबसिडी पूर्ववत सुरू करावी, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी आमदार विजय घोडमारे(पाटील), रा.का.पा हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे, महिला बालकल्याण सभापती उज्वला बोंढारे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, सुचित्रा ठाकरे,रा.का.पा युवक जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, रा.का.पा. तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, सभापती सुषमा कावळे,माजी सभापती बबनराव अव्हाळे,रा.का.पामहिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर,रा.का.पा युवक तालुका अध्यक्ष आशिष पुंड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंगारे, प.स.सदस्य सुनील बोंदाडे, पोर्णिमा दिक्षित, विनोद ठाकरे, विठ्ठल कोहाड, रमेश ठवरे, सुधाकर धामंदे, योगेश सातपुते, सुशिल दिक्षित, राजेंद्र गोतमारे, प्रमोद बंग,विलास वाघ, युसुफ पठाण, देवराव मसराम, अशोक लोकरे, प्रेमलाल चौधरी, सुरेश शेंडे, प्रवीण कडू, मनोज पन्नासे, प्रमोद फुलकर, महेश बंग, गोवर्धन प्रधान,महेश राजपूत, दीपक वर्मा, लीलाधर दाभे, रमेश सावरकर, विजय सुरकार, पंढरीनाथ खाडे, हनुमंत दुधबळे, नरेश नरड, युराज पुंड,निखिल उमरेडकर, पिंटू माथनकर, प्रभाकर लेकुरवाळे, विठ्ठल हुलके, राजेश मोहोड, वैजनाथ उपाध्याय प्यारू पठाण आदी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

का केला वाघाने विशेष पथकावरच वाघाचा हल्ला… वाचा

divyanirdhar

कॉंग्रेसचे दरवाढीविरोधात गोधनी येथे आंदोलन ; केंद्र सरकारचा केला निषेध

divyanirdhar

महापौर चषकात घोटाळा : लेखा परीक्षण अहवाल, कंचर्लावार यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार

divyanirdhar

नाहरकत प्रमाणपत्रासाठी केली 50 हजारांची मागणी; सहायक नगर रचनाकार लाचेत अडकले

divyanirdhar

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना पदावरून हटविले;राजकीय पक्षात बौद्ध पुढाऱ्यांवरील अन्यायाची परंपरा कायम

divyanirdhar

आमदार समीर कुणावार म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी, “ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन” मोहीम राबविणार

divyanirdhar