दिव्य निर्धार/प्रतिनिधी
वर्धाः देशासाठी आयुष्यभर झटणाऱ्या एक सेवानिवृत्त बीएसएफ जवान विनोद हजारे यांचा सेवानिवृत्ती सपत्नीक सत्कार करण्याता आला. त्यांनी २१ वर्षे देशसेवा केली. याची जाणिव ठेऊन माजी सैनिक प्रवीण पेठे यांच्या पुढाकाराने त्यांचा सत्कार करण्यात आला.
भारत सीमेचे तटरक्षक 64 बटालीयन सीमा सुरक्षा बलचे जवान वर्धेचे सुपुत्र मुख्य आरक्षक विनोद हजारे हे त्रिपुरा राज्यातून माँईड मलेरिया आजाराचे थैमान असते, अशा अतिसंवेदनशील भागातून देशसेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांनी 21 वर्षे 6 महिने देशसेवा केली सैनिक शहिद झाल्यावर तर सैनिकाचा सन्मान होतोच पंरतु देशसेवा करून सैनिक सेवानिवृत्ती नंतर एकटाच घरी परत येत असतो. परंतु आॕल इंडिया एक्स बी.एस.एफ.असोशियशन वर्धा व माजी बीएसएफ सैनिक प्रविण पेठे यांच्या पुढाकाराने वर्धेत माजी सैनिक सन्मान सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. विनोद हजारे यांचे रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर खूल्या जीपमधून त्यांच्या कुटूंबासह मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
स्वागत कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या निवासस्थानी म्हसाळा येथे छोटेखानी भाषणांनी व अल्पोआहारानी करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा जिल्हा माजी सैनिक संघाचे अध्यक्ष श्याम परसोडकर होते.तर अतिथी म्हणून माजी सैनिक पूर्ण नियुक्त संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष राजेन्र्द मेघे, जय हिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय संचालक बिपीन मोघे, सुभेदार मेजर बुटे ,आदर्श शिक्षक मोहिते, ग्रामपंचायत म्हसाळ्याच्या सरपंच मंगलाताई काचोळे,ग्रामपंचायत,सदस्य अनिल उमाटे, ग्रामपंचायत सदस्या कांताबाई भगत ,जवान प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक विक्रम भांडवलकर,माजी सैनिक राजेन्र्द सेंगल,गणेश वाईको, प्रशिक्षक आकाश मांदाडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील ढाले, मुकुंद नाखले, विलास कांबाळे, बाबाराव कांबळे,चंदू खोंडे, अमिताताई कीटे, प्रवीण हजारे, ममता हजारे उपस्थित होत्या. माजी सैनिक विनोद हजारे ,पत्नी वैशाली हजारे,मुलगा उत्कर्ष हजारे यांचा कुटुंबीक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन ,संचालन ,प्रास्तविक ,आभार माजी सैनिक प्रवीण पेठे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
previous post