Divya Nirdhar
Breaking News
औरंगाबादठळक बातम्यानागपूरपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भसंपादकीय

मातंग समाजाच्या विकासासाठी बीर्टीने केला आराखडा; महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत विविध योजनांवर झाली चर्चा

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आतापर्यंत अनेक विकासाच्या योजना राबवून समाजातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेने केले आहे. राज्यातील अनुसूचित जातीमधील मांतग समाजाच्या विकासासाठी विविध योजना सुरू करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथे जेष्ट साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनामध्ये ही बैठकी आयोजित करण्यात आली असून यामध्ये विविध योजनांवर चर्चा करून त्या अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मांतग समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तातडीने योजनांची अमलबजाणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आयुक्त (समाज कल्याण आयुक्तालय) व महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग विकास कृती विकास आराखडा ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत मातंग समाजात सामाजिक प्रबोधन व्हावे, या दृष्टीने अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या मंचाच्या स्थापनेकरीता २९ डिसेंबर २०२२ रोजी पुणे शहरातील मातंग समाजातील साहित्यिक व विचारवंतांची बैठक घेण्यात आली. बार्टीच्या वतीने डॉ. संभाजी विरांजे (सहा. प्रकल्प व्यवस्थापक) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी बार्टीच्या विविध विभागांची व त्यातील योजनांची माहिती आली. तसेच त्यांना विविध विभाग, ग्रंथालय व फोटो गॅलरी दाखविण्यात आली. यावेळी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रमुख ज्येष्ट साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये पुष्पहार अर्पण करण्यात आले.

बैठकीच्या सुरूवातीला डॉ. श्रीपाल सबनीस व महासंचालक यांनी दीपप्रज्वलन करून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून डॉ.श्रीपाल सबनीस यांचे नाव सूचवून अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. महासंचालक श्री. गजभिये यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते उपस्थित स्वागत केले. महासंचालक श्री. गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविकातून बार्टीने मागील २ वर्षांत केलेल्या विविध कामाची सर्वांना माहिती करून दिली. या बैठकीमध्ये समाजाच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी ज्या सूचना मांडल्या त्याबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. या आराखड्यामध्ये ज्या सूचना, शिफारशी सूचविण्यात आल्या त्याची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभाग व बार्टीतील विविध विभाग कशा पद्धतीने काम करत आहेत, याबद्दलची माहिती देण्यात आली. या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले. त्यात मातंग समाजाच्या सर्वांगणी विकासासाठी विकासात्मक कामे (कृती आराखडा) व प्रबोधनात्मक कामे अशी विभागणी करण्यात आली. विकासात्मक कामामध्ये विविध प्रकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचविणे या योजनांचा लाभ समाजाला अधिकाधिक कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणे ही कामे सूचविण्यात आली. तर प्रबोधनात्मक कामामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची स्थापना करून विवेकवादी, पुरोगामी विचार समाजामध्ये रुजविणे, अण्णा भाऊ साठेंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या विचारांचा प्रसार व प्रचार करणे तसेच क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व मुक्ता साळवे यांच्या जीवन कार्यावर संशोधन करणे इत्यादी उपक्रम राबविण्याचे ठरले.

 

मांतग समाजाच्या विकास आरखडा तयार

प्रबोधनाची चळवळ गतीमान करण्यासाठी अज्ञान अंधश्रध्दाचे निर्मूलन होऊन विवेकवादी विचाराचा प्रचार आणि प्रसार सर्व समाजात होण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची स्थापना करणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंच कार्यकारणी (निमंत्रित) सदस्यांची स्थापना करणे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचारमंच कार्यपध्दती ठरविणे, मंचाची कार्यपध्दती कशी असावी, यावर चर्चा करणे,  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची कार्यक्रम पत्रिका ठरविण्यावर चर्चा करण्यात आली.

आराखड्यानुसार प्रबोधनाची चळवळ गतीमान करण्यासाठी अज्ञान अंधश्रध्दाचे निर्मूलन होऊन विवेकवादी विचाराचा प्रचार आणि प्रसार सर्व समाजात होण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची स्थापना करण्यात यावी असेही ठरविण्यात आले.

त्याप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंच कार्यकारणी (निमंत्रित) सदस्यांची स्थापना करण्याबाबत सदस्यांनी विचारविनिमय केला. ही कार्यकारिणी अशासकीय असून तिचा कार्यकाल सहा महिने इतका असेल असेही यावेळी ठरविण्यात आले. या समाजात पुरोगामी विचाराची रुजवणूक व्हावी. यासाठी ही समिती स्वयंम प्रेरणेने काम करेल. समितीचे स्वरुप अनौपचारिक असून लोकांच्या सहभागातून काम करेल. ही समिती शासकिय नसून केवळ समाजाच्या उत्थानासाठी स्वयंसेवी पद्धतीने कार्य करण्यासाठी ही समिती निर्मिण करण्यात येत आहे. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ट साहित्यिक श्रीपाल सबनिस यांची नियुक्ती करण्यात आली.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचारमंच कार्यपद्धती ठरविणे, मंचाची कार्यपध्दती कशी असावी या संदर्भात महासंचालक श्री. गजभिये यांनी सर्व सदस्यांना आपले विचार व्यक्त करण्याचे सूचित केले. कार्यकारणीमधील सदस्य शाहीर शीतल साठे यांनी सांस्कृतिक क्षेत्राची जबाबदारी घेतली तर मोहिनी मोहिते यांनी अज्ञान अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर मंचाने काम करावे यामध्ये स्वत: देखील काम करणार असल्याचे सांगितले.

पुणे जिल्ह्यात मातंग समाजाची संख्या सर्वात जास्त असल्याने मंचाच्या कार्याची सुरूवात पुणे जिल्ह्यापासून व्हावी, असे ठरविण्यात आले. मंचाची पत्रिका तयार करणे, सांस्कृतिक क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणे.,मातंग समाजाच्या विकासासाठी धोरणात्मक बदल करणे,५. मातंग समाजाच्या विकासासाठी पुढील १० वर्षाचे (Vision and Mission) तयार करणे, मातंग समाजातील सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणाऱ्या कलाकारांना काम देणे. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यासाठी निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, आणि त्या प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर पडलेल्या किमान १५ टक्के मुलांना नोकरीच्या संधी मिळवून देणे, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेण्याबाबत जात वैधता प्रमाणपत्राची अडचण निर्माण होऊ नये म्हणून जात वैधता प्रमाणपत्र त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यकारणी समितीची स्थापना करण्यात यावी. भीमा कोरेगाव येथील युद्धात सहभागी असलेल्या मातंग समाजाच्या शूरवीरांवर संशोधन करण्यात यावे, असेही ठरविण्यात आले. मातंग समाजातील गावा-गावातील वस्तीमधल्या लोकांपर्यत व्यसनमुक्तीवर कार्यक्रम आयोजित करण्यावरही यावेळी भर देण्यात आला. मातंग समाजातील पुरोगामी विचारांच्या तज्ञ व्यक्तींची ओळख बार्टीच्या माध्यमातून व्हावी व त्यांचे साहित्य प्रकाशीत करावे. गावातील मातंग समाजाच्या वस्तीमध्ये समाज मंदीराच्या बाजुला अभ्यासिका व ग्रंथालयाची सुरूवात करण्यावर भर देण्यात आला. गावातील मातंग समाजाच्या वस्तीमधील जे समाज मंदीर सद्यस्थितीत  नादुरूस्त आहे, अशा समाज मंदीराला रंगरंगोटी, स्वच्छता करणे, दुरूस्ती करणे, आवश्यक तेथे मुक्ता साळवे, क्रांतीवीर लहूजी साळवे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे इत्यादी महापुरुषांचे छायाचित्र लावण्याचा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंचाच्या कार्यकारणीने जे काम केले त्याच्या प्रचार व प्रसार सोशल मिडीयाचा वापर जास्तीत-जास्त प्रमाणात करावा, असेही ठरविण्यात आले. बार्टीमध्ये सर्व विभागामार्फत जे मातंग समाज विकासाच्या अनुषंगाने ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांची सर्व समजापर्यंत पोहचविणे.  शिक्षणासंबंधीत इतर सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतीवर लहूजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे अशा महान व्यक्तींवर साहित्य जास्तीत-जास्त प्रमाणात प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या आराखड्यामुळे मातंग समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रम, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा पुढाकार

divyanirdhar

divyanirdhar

खरंच, आपण बौद्ध आहोत?

divyanirdhar

प्रतिमा सुधारण्यासाठी अबब… 24 लाखांचे कंत्राट ः चंद्रपूर पालिकेचा प्रताप

divyanirdhar

गरज पर्यावरण संतुलनाची

divyanirdhar

सरकार काय मेल्यावर पैसे देईल़, रमाई घरकुल योजनेचा निधी आटला़

divyanirdhar