Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

हिंगणा, कुहीसाठी भाजपने फुंकले रणशिंग; जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्त्वात उमेदवारांच्या मुलाखती

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः नागपूर जिल्ह्यातील कुही व हिंगणा नगरपंचायतची निवडणुक होत असून आज ,भारतीय जनता पार्टी वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी कुही व हिंगणा येथे उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कुहीमध्ये भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, कुही नगरपंचायतीचे निवडणूक प्रमुख व आमदार टेकचंदजी सावरकर, माजी आमदार सुधीरजी पारवे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तर हिंगणा नगरपपंचायतीमध्ये निवडणूक प्रमुख व मदार समीर मेघे, भाजप नेते श्रीकांतजी देशपांडे, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अजय बोढारे यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी आस्तिकजी सहारे, आनंद खडसे, भाजयुमो नागपूर जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, भाजप जिल्हा मंत्री विशाल भोसले, कुही शहर अध्यक्ष प्रकाश थोटे, महामंत्री अमित मांडवे, विकी दुधपचारे, धनराज चकोले, चांदाताई वानखेडे, ईश्वर धनजोडे , युवा मोर्चा अध्यक्ष निखिल येळणे, महामंत्री संकेत खतवार, विशाल डहाके,मयुर थोटे, दिशांत शंभरकर,तसेच संजय कांबळे पांडुरंग लेंडे कडवं ताई नामदेव मार्बते, नरेंद झुरमुरे, दिनेश लांजेवार,विक्की भालोटिया, स्वप्नील लेंडे,मदन कडव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कोरोना रोखण्यासाठी हे केले उपाय…वाचा

divyanirdhar

महापारेषण कंपनीकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधी; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

divyanirdhar

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ः महाविद्यालयावर कारवाईची राष्ट्रवादीच्या नेत्या सोनम उके यांची मागणी

divyanirdhar

बेरोजगारांच्या हाताला काम दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे यांचा संकल्प

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar