Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरसंपादकीय

कोल्हापुरी चप्पलेची इटलीत छाप; लिडकॉम संचालक मंडळ अध्यक्ष व विभागाचे सचिव सुमंत भांगे यांचे विशेष योगदान

इटली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पलेची छाप पडली. महाराष्‍ट्र सरकार, सुमंत भांगे हे अध्यक्ष या नात्याने ते नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी सपोर्ट करतात. त्यामुळे हे शक्य झाले. लिडकामचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पुढाकारातून इटलीचा दौरा नुकताच पार पडला. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पलेला मिळालेले स्थान आणि मान हा बहुधा पहिल्यांदाच मिळालेला असावा. यानिमित्ताने चर्मकार उद्योजकांमध्ये नवी उमेद जागृत झाली आहे. एखादा चांगला अधिकारी मिळाला की समाजाची आणि त्या विभागाची कशी प्रगती होते त्याचे उत्तम उदाहरण आहे. धम्मज्योती गजभिये यांच्या निमित्ताने महामंडळाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना वाढीस लागली आहे.

गेल्या काही वर्षांत अनुसूचित जातींमधील वर्गांना विकासाची संधी मिळत आहे. राज्य शासनाने स्थापन केलेल्या अनेक महामंडळातून विकासाच्या योजना सुरू आहेत. त्या योजनांचा लाभ आतापर्यंत अनेक लोकांना झाला. मात्र, गेल्या काही वर्षांत मागास वर्गांच्या हक्काचे विकासपीठ असलेल्या सामाजिक न्याय विभागाकडे दुर्लक्ष झाले. कर्मचाऱ्याची कमतरता, त्यातही व्हिजनलेस अधिकाऱ्यांची नियुक्ती, यामुळे मागासाच्या विकासाची वाट खुटंल्याचे दिसत होते. दरम्यान काही अधिकारी चांगले मिळाले. त्यातीलच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांचे नाव प्रामुख्याने आणि अग्रक्रमाने घ्यावे लागते. समाजाप्रति त्यांची बांधिलकी अनेकांना दिशा देणारी आहे. अत्यंत हुशार आणि युवा अधिकारी म्हणून यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याने ते पोस्ट खात्यात रुजू झाले. अल्पावधीत ते प्रतिनियुक्तीवर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागात दाखल झाले. बार्टीचे महासंचालक असताना त्यांनी नवनवीन प्रयोग केले. यातून बार्टीला त्यांनी व्या शिखरावर पोहोचविले. बार्टीला गावागावांत पोहोचविण्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त धम्मज्योती गजभिये यांनाच जाते. सर्व जातीसमूहाचा अभ्यास करून अनेक चांगल्या योजना राबविण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यांची ओळख करून देण्याचा फार प्रयत्न करणार नाही मात्र, अधिकाऱ्यांचे कौतुक होत नाही हे वास्तव स्वीकारूच त्यांच्याबद्दल माहिती देत आहे.गेल्या सहा महिन्यापासून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी लिडकाममध्ये रुजू होताच आपल्या कामाची चुणूक दाखविली. काम करण्याची इच्छा असली की अनेक मदतीसाठी हात पुढे येतात. या महामंडळात रुजू होतात त्यांनी विस्कटलेली घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. जिल्हास्तरावर दौरे करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. लिडकाम मधील अनेक योजनांचा कार्यान्वित करून तळागळातील तसेच शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतील याकरिता त्यांनी प्रयत्न केला. चर्मकार आणि ढोर समाजाच्या उत्थानासाठी निर्माण केलेले महामंडळाला नवसंजीवनी देण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. त्याचे फळ म्हणून कोल्हापूरची चप्पल इटलीत दाखल झाली. इटली येथील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल भाव खाऊन गेली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध दिली. इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आली. येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पललेला स्थान मिळण्याची बहुतांश ही पहिलीच वेळ असेल यात शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय विभागाचे लोकप्रिय सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनात इटलीच्या प्रदर्शनामध्ये दौरा करण्याची संधी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये आणि त्यांच्या शिष्टमंडळाला मिळाली. आणि या संधीचे सोने धम्मज्योती गजभिये यांनी केली. त्यांचा इटलीचा दौरा यशस्वीरीत्या पार पडला. अनेकांना आता कोल्हापुरी चप्पलेची भुरळ पडली आहे. महामंडळाने १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पलेला चांगली मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे. हे सर्व प्रयत्न व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आले. येथील प्रदर्शनात महामंडळाचा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी भेट दिली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शनसुद्धा केला. राज्यातील चर्मकार व ढोर समाजातील युवकांना रोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा विडा सध्या धम्मज्योती गजभिये यांनी उचलला आहे. दौऱ्यामध्ये धम्मज्योती गजभिये आणि त्यांच्या शिष्टमंडळाने अनेक विषयांचा अभ्यास करून भविष्यात चर्मकार समाजातील युवकांसाठी काही नवीन योजना तयार करून त्यांना विकासाचा सूर्य दाखविण्याचा त्यांचा मानस आहे. आतापर्यंत अनेक अधिकारी या महामंडळात आले. पण श्री. गजभिये यांच्यासारखे व्हीजन त्यांच्याकडे नव्हते म्हणून गेल्या काही वर्षांत या महामंडळाच्या अनेक योजना रखडल्या होत्या. त्यांना संजिवनी देण्याचे प्रथम कार्य त्यांनी केले. चर्मकार समाजातील युवकांसोबत महिला उद्योजकांसाठी नवनवीन योजना सरकारच्या मदतीने तयार करून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. युवकांना रोजगाराकडे वळा, असा त्यांचा संदेश असून प्रत्येकांना महामंडळातर्फे सुलभ कर्ज कसे उपलब्ध करून देता येईल, यावर त्यांचा भर आहे. सरकारनेही त्यांच्या प्रयत्नांना सहकार्य करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने महामंडळाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही दिली. त्यामुळेच त्यांचा हुरूप वाढला आहे. ग्रामीण भागातील चर्मकार समाजातील प्रत्येक युवकाला रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही त्यांची भर आहे. इटली येथील आंतरराष्ट्रीय दौरा यशस्वी झाल्यानंतर आता महामंडळाचा मेकओव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चर्मकार समाजातील प्रत्येक कुटुंबाला या महामंडळाची ओळख व्हावी आणि हे महामंडळ आपल्या हक्काचे असून यातून आपला विकास साधला जाईल, याची हमी देण्याचे काम व्यवस्थाकीय संचालक धम्मज्योती गजभिये करीत आहेत. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना १ मे, १९७४ रोजी कंपनी अधिनियम १९५६ अनुसार करण्यात आली. या महामंडळात विविध चर्मवस्तू उत्पादित करून सदरच्या वस्तू शासकीय, निमशासकीय विभागांना पुरवठा करण्यात येतात. अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचाविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांना गावागावांत पोहोचविण्याचे बळ श्री. गजभिये देत आहेत.इटली येथील दौरा ही विकासाची चुणूक आहे. यानंतरही अनेक कार्यक्रम योजनाबद्धरितीने राबविण्यात येतील, असे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. महामंडळाच्या माध्यमातून गावागावात विकासाची गंगा पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. एक चांगला अधिकारी विकास कसा झपाट्याने करू शकतो. याचे हे उत्तम उदाहरण आहे.

संबंधित पोस्ट

अतिक्रमण हटविताना अडथळा, नगराध्यक्षांसह 13 जणांवर गुन्हे दाखल

divyanirdhar

म्हसली येथील ग्रामपंचायतीत घोळच घोळ

divyanirdhar

नागपूर मनपाचा खड्ड्यांवर कोट्यवधींचा खर्च,कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे नियोजन

divyanirdhar

शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०

divyanirdhar

राज्य लेखा परीक्षकांची नागपुरात कार्यशाळा; राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

divyanirdhar

देशमुखांना दिलासा नाहीच! ;उच्च न्यायालयाचा तपासात हस्तक्षेपास नकार

divyanirdhar