नागपूर ः महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या संत गाडगे महाराज यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची भावना राज्यातील धोबी-परीट समाजामध्ये निर्माण होते आहे. राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून संत गाडगेबाबा यांना देशाचे स्वच्छतेचे अग्रदूत म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धोबी-समाज महासंघ (सर्वभाषिक)चे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी केला आहे.
गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे, असेही डी.डी. सोनट्क्के म्हणाले.
लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. त्याचा आदर्श महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात घेतला जात आहे. मात्र, सरकारकडून त्यांची अवेहलना होताना दिसून येत आहे. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबविण्यात सरकार मागे पडले असून सरकारने संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेचे अग्रदूर जाहीर करून त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान करावा, अशी मागणी डी.डी. सोनटक्के यांनी केली आहे.
दिव्य निर्धार
नागपूर ः महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या संत गाडगे महाराज यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची भावना राज्यातील धोबी-परीट समाजामध्ये निर्माण होते आहे. राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून संत गाडगेबाबा यांना देशाचे स्वच्छतेचे अग्रदूत म्हणून मान्यता द्यावी आणि त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य धोबी-समाज महासंघ (सर्वभाषिक)चे अध्यक्ष डी.डी. सोनटक्के यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याचे निवदेन देण्यात येणार आहे.
गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे, असेही डी.डी. सोनटक्के म्हणाले.
लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. त्याचा आदर्श महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात घेतला जात आहे. मात्र, सरकारकडून त्यांची अवहेलना होताना दिसून येत आहे. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबविण्यात सरकार मागे पडले असून सरकारने संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेचे अग्रदूत जाहीर करून त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान करावा, अशी मागणी डी.डी. सोनटक्के यांनी केली आहे.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे
स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती डी.डी. सोनटक्के यांनी दिली. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यशासनाला प्रस्ताव पाठविण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे श्री. सोनटक्के यांनी सांगितले.