Divya Nirdhar
Breaking News
bhmase
ठळक बातम्यानागपूरमुंबईराजकीयविदर्भ

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
नागपूर: भारतीय मजदूर संघाने संपूर्ण देशातून विविध संघटनांच्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करून बेरोजगार झालेल्यांना तसेच ज्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली अशा लोकांना मदतीचा हात देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे लावून तुरुंगात डांबण्यात आले, त्यांना सोडविण्याकरिता वकीलांची टीम तयार केली जाणार आहे. एवढ्या भीषण अत्याचाराने पश्चिम बंगाल ढवळून निघूनही राज्य सरकारने याची दखल घेतलेली नाही, याकडेही या कार्यक्रमात उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले.
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भामसं नागपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गणेश मिश्रा बोलत होते. तेथील वस्तुस्थिती मांडताना ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विविध संघटनांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी लक्ष्य केले आहे. असामाजिक तत्वांनी प्रचंड धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेसह संघ परिवारातील संघटनांच्या कार्यकर्त्यांचा छळ चालविला आहे. तृणमूलच्या गुंडांनी कार्यकर्त्यांच्या आया बहिणींसह, कुटुंबातील इतर सदस्यांवरही अत्याचार करून त्यांची घरे जाळून टाकली. घरातील सामान लुटून नेले.

भामसंचे सभासद असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. भामसंच्या सभासदांना नोकर्यांअवर ठेवू नका, तसेच राज्यात फक्त तृणमूल काँग्रेसच्या कामगार संघटना कार्यरत राहतील, असा धमकीवजा इशारा देऊन अनेकांची जीवन जगण्याची साधने हिसकावून घेण्यात आली आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांसमोर पुढील जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहितीही गणेश मिश्रा यांनी दिली.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला ऊत आला असून, पक्षाच्या गुंडांनी चालविलेले अमानुष अत्याचार, हिंसक हल्ले आणि जाळपोळीमुळे भारतीय मजदूर संघ आणि संघपरिवारातील कार्यकर्ते भयभीत आहेत. काही कार्यकर्ते अद्याप बेपत्ता असून सुमारे 325 कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय संघटनमंत्री तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक गणेश मिश्रा यांनी पश्चिम बंगाल येथून आभासी पद्धतीने उपस्थित राहून नागपूरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली. हिंसाचारात भाजप, भामसंसह संघ परिवरातील 41 कार्यकर्त्यांची आजवर हत्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी भारतीय मजदूर संघाचे पश्चिम क्षेत्र प्रभारी सी. व्ही. राजेश, वरिष्ठ नागरिक परिसंघाचे राष्ट्रीय महामंत्री वसंत पिंपळापुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीता चोबे, राष्ट्रीय मंत्री रवींद्र हिंमते, प्रदेश संगठन मंत्री रमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा देशपांडे, प्रदेश सचिव शुभदा वाघ, एलआयसी कर्मचार्यांरचे नेते मिलींद बल्लाळ, कार्यालय मंत्री प्रकाश वणीकर, कामगार नेते जयंत आस्वले, जिल्हा अध्यक्ष गणेश गुल्हाने, संघटन मंत्री हर्षल ठोंबरे, कोषाध्यक्ष सुहास तिवारी, कार्याध्यक्ष विजय ठाकरे, सहमंत्री गोरखनाथ नाखले, अंकुश भांगे, संकोचन नरांजे, सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाचे तीर्थराज बडणे, रवी कुलरकर, सुनीता शंभरकर आदी आभासी पद्धतीने अनेक उपस्थित होते. कार्यक‘माचे संचालन जिल्हा प्रमुख गजानन गटलेवार यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश गुल्हाने यांनी केले.

संबंधित पोस्ट

ग्रामसेवकांच्या प्रवासभत्त्यात वाढ कमी असल्याची खंत

divyanirdhar

‘अनामित्रा प्रॉपर्टीज’च्या संचालकाकडून मेहता यांना सदनिकेची विक्री

divyanirdhar

सेवा फाउंडेशन करणार १ हजार १११ झाडांची लागवड

divyanirdhar

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या कारभाराची चौकशी करा; आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदागवळी यांची मागणी

divyanirdhar

महापारेषण कंपनीकडून कोरोना उपाययोजनांसाठी निधी; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द

divyanirdhar

नागपूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र काढले

divyanirdhar