Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीयविदर्भ

कार्यकर्त्यांचा वाणवा तरीही राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाचे एकला चलो रे तुणतुणे…

नागपूर ः नागपूर शहरामध्ये कार्यकर्ते कमी आणि नेत्यांचा अधिक भरणा असलेला राष्ट्रवादी कॉग्रेस स्वबळावर महानगर पालिकेची निवडणूक लढून सत्तसुंदरीचे स्वप्न पहात आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न फक्त नेत्यांच्या भरवशावर पूर्ण होईल काय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या निवडणुकीत फक्त एक नगरसेवक निवडू आल्यानंतर पक्षबांधणी ऐवजी कुरघोड्या करण्यात नेत्यांचा वेळ गेला. आठ महिन्यावर पालिकेची निवडणूक आली आहे. कार्यकर्त्यांची फळी नसताना राष्ट्रवादी कॉग्रेस स्वबळाची तयारी करीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

duneswar pethe
duneswar pethe

आठ दिवसांपूर्वी नागपूर शहर अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली. दुनेश्वर पेठे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वबळाचा ढोल वाजविला तर कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांनी स्वबळावर लढाच, असा मिस्कील सल्ला दिला. नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अधिक आहे. त्यांचे प्राबल्य महाराष्ट्रात आहे, यात कोणताही शंका नाही. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. तर प्रकाश गजभिये आमदार होते. तसेच अनेक पावरफुल नेतेही राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र, त्यानुसार कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यास हे नेते अपयशी ठरले आहे. आतापर्यत त्यांनी कॉंग्रेससोबत युती करून निवडणूक लढल्या आहेत. आता मात्र, त्यांनी शिवसेनेसोबत घरोबा करून नागपूर काबीज करण्याचा इरादा आहे. हात त्यांचा मनसुबा किती यशस्वी होतो हे राष्ट्रवादीच्या नेत्याच माहीत. शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत राहिली आहे. नागपुरात त्याचे आठ नगरसेवक असायचे मात्र, २०१७ मध्ये फक्त २ नगरसेवक निवडून आले. किशोर कुमेरिया यांच्या बळावर या दोन जागा आल्या. आता शिवसेनेसोबत छुपी युतीची प्रस्ताव राष्ट्रवादीचा असल्याचे बोलले जाते. कारण कॉंग्रेस डोईजड होऊ नये आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत असल्याने आत्तापासून ते प्रेशर तयार करीत आहेत. मात्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावरचा नारा दिल्याने ते प्रेशरही फुसके निघण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात १५८ नगरसेवक आहेत. एवढे उमेदवार कुठून आणणार असा प्रश्न नवनियुक्त शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासमोर आहे.

राष्ट्रवादी नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत तब्बल दोन डझन नेते उपस्थित होते. कार्यकर्ते मात्र कमी होते. त्यामुळे त्यांची ‘एक बूथ अकरा युथ’ही घोषणा फक्त घोषणाच राहण्याची शक्यता आहे. शहरात सुमारे १९०० बूथ आहेत. एका बूथवर १० कार्यकर्त्यांची नियुक्ती करायची असल्यास सुमारे 20 हजार कार्यकर्त्यांची आवश्यकता भासणार आहे. ही कार्यकर्त्यांची गरज कुठून पूर्ण केली जाईल हा एक प्रश्नच आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला. त्याच्याकडेच आता शहराध्यक्षपदी जबाबदारी मिळाली आहे. भाजपने आपल्या फायद्यासाठी चार वॉर्डांचा प्रभाग केला. त्यामुळे राष्ट्रवादीची पडझड झाल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे. मागील निवडणुकीत शेवटपर्यंत काँग्रेससोबत समाधानकारक जागेबाबत बोलणी झाली नव्हती. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला आपले उमेदवार जाहीर करावे लागले. तेसुद्धा पूर्ण प्रभागात मिळू शकले नव्हते. अनेकांचे नावे जाहीर केली. मात्र त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. काही उमेदवारांची नावे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांच्याही यादीत होती. यापूर्वी काँग्रेससोबत आघाडी असतानाही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आकडा आठच्यावर सरकला नाही. त्यांपैकी काही आता भाजप व काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत. काहींचे अस्तित्व संपले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अपवाद वगळता आमदारांची संख्यासुद्धा इतक्या वर्षांत वाढलेली नाही. त्यामुळे स्वबळावर उमेदवार निवडण्यासाठी अध्यक्ष पेठे यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

संबंधित पोस्ट

कोल्हापुरी चप्पलेची इटलीत छाप; लिडकॉम संचालक मंडळ अध्यक्ष व विभागाचे सचिव सुमंत भांगे यांचे विशेष योगदान

divyanirdhar

आमदार समीर कुणावार यांनी शहरवासियांना दिली अनोखी दिवाळी भेट

divyanirdhar

रिपब्लिकन पक्षाचे रिद्देश्वर बेले यांना विजय करा; जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांचे मतदारांना आवाहन

divyanirdhar

जिल्हा भूमापन अधिकाऱ्यांनी दिला ‘कांदा’ ठेवण्याचा सल्ला;भरउन्हात बांधावर; वरिष्ठांच्या आडमुठे धोरणामुळे कर्मचारी झाले हैराण

divyanirdhar

कॉंग्रेस नेत्यांना रामटेकमध्ये बौद्धांची ‘एलर्जी’

divyanirdhar

पद टिकवण्यासाठी सरपंचाचा अफलातून आटापिटा; प्रथम बनावट जातवैधता प्रमाणपत्र,नंतर खोटे मृत्यूपत्र सादर

divyanirdhar