नागपूर : कोरोना महामारी सगळ्यांना अनपेक्षित आहे. नैसर्गिक महामारी मुळे सगळे प्रशासन हतबल झाले होते. कोरोना काळ म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा, आरोग्य मंत्रालय, डॉक्टर्स,नर्सेस आणि सगळा हेल्थकेयर व्यवस्थेनेच नांगी टाकली होती. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीचे शिवधनयुष्य पेलायचे कसे ? आरोग्य यंत्रणेला हा भार झेपावणार कसा ? कोरोना च्या पहिला लाटेत भविष्यातील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.
सगळीकडे धावपळ, पळापळ, हुल्लड, जिकडे इकडे लोकांची गर्दी होती.मागील वर्षीचा लॉकडाऊन हा सगळ्याकरिता अनोखा आगळावेगळा अनुभव होता.नौकरदार, मध्यमवर्ग, व्यावसायिक इत्यादी वर्गाकडे थोडी फार बचत असल्यामुळे त्यांची उपासमारीची भ्रांत न्हवती.खरा प्रश्न होता तो म्हणजे झोपडपट्टी, बेघर, फुटपाथ, फेरीवाले, अनाथ, अपंग, वयोवृद्ध या वर्गांचा आणि नागपुरातील बाहेर गावातील शिक्षणाकरिता असलेला विद्यार्थी वर्गाला दोन वेळचे हायजेनिक जेवण कसे मिळेल याचा…. ! राज्य सरकारने कम्युनिटी किचन ची गाईडलाईन आखून दिली असली तरीही ती व्यावहारिक स्तरावर उतरविणे म्हणजे प्रशासना पुढील हिमालया एवढे आव्हान होते. हे आव्हान कोरोना च्या पहिला लाटेला यशस्वीपणे पेलले ते म्हणजे विद्यमान मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी.
हे हिमालय एवढे आव्हान कसे पेलले ? नियोजन कसे होते ? फूड पॅकेट ची वितरण व्यवस्था कशी होती ? मुंबईतील डबेवाल्यांचे फूड वितरण जसे असते तीच व्यवस्था कोरोना काळात “कम्युनिटी किचन” च्या माध्यमातून नागपूर महानगर पालिका उपायुक्त मिलिंद मेश्राम या अधिकाराने कौशल्याने आणि शिताफीने राबविली. लाखो झोपडपट्टी, बेघर, फुटपाथ, फेरीवाले, अनाथ, अपंग, वयोवृद्ध या वर्गांचा हायजेनिक फूड वेळेवर मिळाले आणि त्यांची उपासमार थाबली. त्या अनुषंगाने सिटी एडिटर सुजित ठमके यांच्याशी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी विशेष मुलाखत त्याचा सारांश !
प्रश्न – कोरोना काळात मैत्री परिवारातून लाखो लोकांची उपासमार कशी थाबली ?
मिलिंद मेश्राम – कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सगळेच हतबल झाले होते. लॉकडाऊन हे सगळ्यांकरिता नवीनच. कधी न बघितलेले…. ! एक ना लाखो प्रश्न या निमित्याने उभे होते. एकीकडे आरोग्य यंत्रने पुढील आव्हाने तर दुसरीकडे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या फूड वितरण व्यवस्थेचे नियोजन करायचे कसे हा कळीचा प्रश्न ? मैत्री परिवाराच्या माध्यमातून हे आम्ही आव्हान यशस्वी पेलले.
प्रश्न – फूड वितरणाचे आव्हान मोठे होते ते यशस्वी पेलले म्हणजे नेकमे काय ?
मिलिंद मेश्राम – नागपुरातील ६७ एनजीओ ना आम्ही ट्रॅप केले. त्यातील केवळ २७ एनजीओ ऍक्टिव्ह होता . त्यांना सोबत घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थाना सोबत घेतले.नागपूर महापौर, नागपूर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त इत्यादींनी जबाबदारी दिली होती. प्रत्येक भागातील सामाजिक संगठना आणि त्यासंबंधी कार्यकर्ते, एनजीओ इत्यादींना विचारात घेतले. हि नैसर्गिक आपत्ती आहे आपण सगळ्यांनी मिळून जर काम केले तर यावर आपण विजय मिळवू त्यामुळे त्यांनी हे शिवधनयुष्य खांद्यावर घेतले आणि ते यशस्वी पेलले.
प्रश्न – कम्युनिटी किचन म्हणजे नेमके काय आहे ? हा प्रयोग नागपुरात कसा यशस्वी ठरला ? किती टीम याकरिता सक्रिय होता ?
मिलिंद मेश्राम – महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात काही गाईडलाईन आखून दिल्या होता.कम्युनिटी किचन म्हणजेच गरजूना सामुदायिक हायजेनिक फूड उपलब्ध होणे. मैत्री संघाच्या माध्यमातून कम्युनिटी किचन च्या द्वारा कुणीही नागपुरात उपाशी पोटी झोपू नये. किंवा उपासमारी मुळे कुणाचा मृत्य होऊ नये म्हणून २० टीम फूड वितरणाकरिता ठेवण्यात आला होता. ३ कम्युनिटी किचन च्या माध्यमातून हायजेनिक फूड लाखो लोकांना शहरात वितरित करण्यात आले होते.नागपूर महानगर पालिकेने २४ & ७ हेल्पलाईन सुरु केली होती. टोल फ्री न. वर कुणीही कुठल्याही भागातून फोन केल्यास गरजूना तात्काळ फूड उपलब्ध झाले. हा एक प्रकारे मुंबईतील डबेवाला चा प्रयोग होता जो कोरोना काळात यशस्वी ठरला. दररोज ५० ते ६० हजार फूड वितरणाचे आव्हान खूप मोठे होते. त्याकरिता मनपा प्रशासनाने ट्रान्सपोर्ट व्यवस्था उभी केली. घरच्या सारखे हायजेनिक जेवण सगळ्यांना उपलब्ध होणे हि प्रशासनाकरिता खूप मोठी अचिव्हमेंट आहे. प्रशासनाने या मधून भरपूर शिकले आहे.