Divya Nirdhar
Breaking News
nitin-raut
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

नागपूर : ज्या जिल्ह्य़ात करोनाची साथ नियंत्रणात आहे तेथील निर्बंध शिथिल करण्याच्या राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेने शहरातील करोना र्निबधात काही प्रमाणात अंशत: सूट दिली आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंसह इतरही दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र मॉल बंद राहतील. इतर वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्य़ातील कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिलतेचे आदेश जारी केले. ते १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. यापूर्वी ही दुकाने ७ ते ११ या काळात सुरू होती. मात्र मॉल बंद असेल. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्तूंची अर्थात एकटी दुकाने (नॉन ऐसेन्सियल, स्टॅड अलोन, बाजारपेठेतील नाही) सुद्धा सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक दुकाने सुरू असतील.
कृषी संदर्भातील खते, बियाणे इत्यादी दुकाने सर्व सात दिवस सकाळी ७ ते दुपारी २ सुरू असतील. खाद्यपदार्थ, मद्य, ई कॉमर्स व आवश्यक सेवेतील सर्व बाबींची होम डिलिव्हरी रात्री ११ पर्यंत सुरू राहील. तथापि, मार्निग वॉक, आऊट डोअर स्पोर्टस बंद असेल. सर्व सरकारी कार्यालय २५ टक्के उपस्थितीत
सुरू असेल. सर्व खाजगी कार्यालये बंद असतील. सबळ कारणाशिवाय दुपारी ३ नंतर रस्त्यावर फिरण्यास बंदी राहील. याशिवाय २२ एप्रिलपासून शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सुरू ठेवलेले निर्बंध कायम राहतील.
पुढील आठवडय़ामध्ये पुन्हा एकदा आढावा घेऊन निर्बंध शिथिल किंवा आणखी कडक करण्याबाबतचे निर्णय घेतले जातील. मात्र जनतेने बेसावध राहू नये. प्रशासनाने या काळामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करण्याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या बैठकीत उपस्थित झालेल्या काही खाजगी इस्पितळाच्या संदर्भातील रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष वेधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. दुकानांना वस्तू पुरवठा करणाऱ्या वाहनांच्या अवागमनावर बंदी नसेल पण निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. १५ जूननंतर स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील १५ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. नागपुरातील जनतेने देखील शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे, गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये. या १५ दिवसांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना आणखी बळकट कराव्यात.
–डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री

अशी आहे नियमावली

 • अत्यावश्यक सेवेतील तसेच इतर (अत्यावश्यक सेवेशिवाय
  (एकटी) दुकाने स. ७ ते दु. २ पर्यंत उघडी राहणार.
 • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद.
  खते, बियाण्यांची दुकाने स. ७ ते दु. २ पर्यंत सुरूय
  खाद्यपदार्थ,मद्य, इ कॉमर्स व आवश्यक सेवेतील वस्तूंची
  घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत.
 • मालवाहतूक सुरू.
  मॉर्निग वॉक, क्रीडांगणावरील क्रीडा प्रकार बंद.
  सरकारी कार्यालयातील उपस्थिती २५ टक्के.
  खासगी कार्यालये बंद.
  सबळ कारणाशिवाय दुपारी ३ नंतर फिरण्यास बंदी.

संबंधित पोस्ट

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या कारभाराची चौकशी करा; आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदागवळी यांची मागणी

divyanirdhar

माजी कृषींमंत्री अनिल बोंडे म्हणाले, कृषी कायदे कधी रद्द होणार नाहीत…

divyanirdhar

मागासजातीचे होणार बेंचमार्क सर्वेक्षण; बार्टीचा पुढाकार; ४०७ गावांची निवड

divyanirdhar

खासदार मेंढे म्हणाले, ग्रामीण भागात तयार करा रोजगार 

divyanirdhar

मागासवर्गीयांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेचे लक्ष्यांक वाढवा; राहुल घरडे यांची मागणी

divyanirdhar

`मजीप्रा` च्या कर्मचार्‍यांचे काळ्याफिती लावून काम

divyanirdhar