नागपूरः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त हुडकेश्वर- नरसाळा येथे भाजपतर्फे आरोग्य सेवक व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मेडिकल किटचे वाटप करण्यात आले.भाजप, वैद्यकीय आघाडीवतीने हा कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अजय बोढारे,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव डी. डी. सोनटक्के व वैद्यकीय आघाडी नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रीती मानमोडे यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक भगवान मेंढे, स्वाती आखतकर, लीला हातीबेड, विद्या मडावी, हुडकेश्वर नरसाळा प्रभाग २९ चे अध्यक्ष मनोज लक्षणे, कपिल आदमने, डॉ छाया दुरुगकर,अभिजित वाघ, सचिन जोध, नितीन वैद्य, पंकज देशमुख, गोपाल ढोणे, विजय शेंडे, दीपकजी वाघमारे, आकाश डहाके, अभय डेंगे, दिनेश सिसोदीया, राजेश नेरकर, प्रणय भदाडे, रजनी गुरपूडे, कविता राठोड, सोनाली बुटले, निशाताई निलटकर, शिवाली वडाळकर,माधुरी बेलसरे, सुचित्रा बरबटे, मंजू फटिंग, पूनम गजभिये यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.