Divya Nirdhar
Breaking News
papalkar-shankarrao
नागपूरभारतमहाराष्ट्रविदर्भ

कोणाला हवाय १८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी कायदा…वाचा

अचलपूर,(अमरावती):   आपले कार्य पूर्ण झालेले नसून १८ वर्षांवरील दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे १२३ अनाथांचे वडील असलेले ज्येष्ठ सेवाकर्मी शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले. बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड बनून भरीव असे समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मानद डी. लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
शंकरबाबा पापळकर हे अनाथ आणि दिव्यांग मुलांचे आधारवड आहेत. अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविश्रांतपणे सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होत असतात. सध्या वसतिगृहात ९८ मुली आणि २५ मुले, असे एकूण १२३ मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित मुले आहेत. वझ्झर येथील आश्रमात १५ हजारांवर झाडे लावण्यात आली असून दररोज ही मुले झाडाला पाणी टाकतात व वाढवतात. त्यामुळे हे वझ्झर मॉडेल सर्वत्र विकसित व्हावे, अशी इच्छा शंकरबाबांनी यावेळी व्यक्त केली.
देशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षांवरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जात असल्याची माहिती आहे. मात्र या दिव्यांगांचे पुढे काय होते, याची कुठलीही नोंद होत नाही. त्यामुळे देशातील १८ वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना मरेपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे. या अनाथांसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करू आणि सरकारला कायदा करण्यासाठी बाध्य करू. त्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनसुद्धा शंकरबाबांनी केले.

स्व. मा. गो. वैद्य यांना पदवी समर्पित
शंकरबाबांनी नागपुरात ज्येष्ठ संपादक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक स्व. मा. गो. वैद्य यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुनंदा वैद्य यांना आपली डी. लिट. पदवी समर्पित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मा. गो. वैद्य हे शंकरबाबांना आपले मानसपुत्र मानत होते.

संबंधित पोस्ट

खासदार प्रफुल्ल पटेलांची मध्यस्थी, धान खरेदीला येणार वेग

divyanirdhar

डॉक्टर म्हणतात, रुग्णालयातील संपले औषध, आणा बाहेरून

divyanirdhar

कॉंग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सहकार्य करा, राहुल घरडे यांनी केले आवाहन

divyanirdhar

हिवाळी अधिवेशनात सावजी हॉटेलची विशेष क्रेझ

divyanirdhar

सरपंच दीपक राऊत यांच्या नेतृत्त्वात शेकडो गरजूंना विविध साहित्याचे वाटप

divyanirdhar

कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेतकरी अडचणी; जागोजागी बंधारे बांधल्याने नदीचे झाले नाले

divyanirdhar