Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमुंबईविदर्भ

स्मशानातून सुरू झाला ‘स्मृतीउद्यान’चा प्रवास; खसाळ्याचा शाश्वत विकास प्रयोग

दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः गावात हिरवळ आणि पाणी घरोघरी पाणी पुनर्रवापराचे नियोजन करून जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील ग्रामपंचायतींना आदर्श घालून देण्याचे काम खसाळा ग्रामपंचायतीने केले. शासनाच्या अनेक योजना आणि उपक्रम राबवून गावाला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हरित योजनेचा प्रारंभही गावातील स्मशानभूमीतून झाला. त्या स्मृतीउद्यान नाव देऊन लोकांचा सामाजिक दृष्टिकोन बदलविण्याचे काम याच गावाने केले.

नागपूर शहरालगत वसलेल्या खसाळा गावाने विकासाच्या परंपरागत चौकटीबाहेर जाऊन एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. कोराडी विद्युत प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या या गावाला पायाभूत सुविधा आधीच लाभलेल्या होत्या. त्यामुळे विकास म्हणजे अजून काय करायचे?, असा प्रश्न सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांना पडला. मात्र त्यांनी हा प्रश्न संधी मानून गावाला एक नवे, सर्जनशील रूप देण्याचा निर्धार केला. खसाळा गावात विकासाच्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या, पण या प्रवासाची सुरुवात त्यांनी स्मशानभूमीपासून केली. ‘अंत तिथून आरंभ’ या संकल्पनेने प्रेरित होऊन, त्यांनी स्मशानभूमीला स्मृतीउद्यानात रूपांतर करण्याचा संकल्प केला. वृक्षारोपण, स्वच्छता, आणि निसर्गसौंदर्य वाढवून या ठिकाणाला शांततेचा हरित केंद्रबिंदू बनवण्यात आले. स्मशानभूमित तलाव आणि शेकडो झाडे लावून त्याला उद्यानाचे रूप देण्यात आले.

‘अक्षता वाटप’मधून ग्रामसभा जागवली
गाव विकासासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव झाल्यावर सरपंच जयश्री इंगोले यांनी ग्रामसभा सुदृढ करण्याचा उपक्रम हाती घेतला. ‘ग्रामसभा’ म्हणजे केवळ एक बैठक नसून, गावाच्या भविष्याचा आरसा आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन ग्रामसभेचे आमंत्रण ‘अक्षता वाटून’ दिले. या उपक्रमाचा अनोखा प्रभाव पडला आणि ग्रामसभेला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित राहू लागले. ग्रामसभेतील लोकांची उपस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावतात. ग्रामसभेच्या उपस्थितीचाही त्यांना आदर्श घालून दिला.

वाचनालय, आणि रस्त्याकडेला झाडांच्या रांगा
गावातील मुलांना विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली. शेकडो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर गावातील प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. ७ हजारांवर झाले लावण्यात आली. आणखी झाले लावून गावात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आले. शासकीय इमारतींची रंगरंगोटी, वळणवाटांवर ओटे, ग्रामगीतेतील सुविचार भिंतीवर, संक्रांतीला महिलांसाठी वाणात

पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत!
गावात पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी जलतारा, शोषखड्डे, स्मृतीउद्यानातील पाझरतलाव आदी जलसंधारणाचे प्रयोग राबवण्यात आले. वॉटर एटीएमचे हजारो लिटर वाया जाणारे पाणी बालोद्यानाकडे वळवले गेले. गावकऱ्यांनी पाण्याच्या पुनर्वापराचे महत्त्व समजून घेतले.पाण्याचा सुनियोजित वापर होण्यासोबतच पाणी साठ्यात वाढ करणे तसेच दीर्घकालीन पाणी साठा टिकविण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर व्हावा यासाठी गावात मोठ्या प्रमाणात शोषखड्डयांची निर्मिती करण्याचा ध्यास ग्रामपंचायतीने घेतला. गावातील ज्या-ज्या खुल्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी शोषखड्ड्ये बांधायला सुरुवात केली. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शोषखड्ड्यांची निर्मिती व्हावी, याकरिता रोज सकाळी ६ ते ८ या वेळात ग्रामस्थ आपला लोकसहभाग नोंदवतात. गावात शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे.

स्मशानभूमीतील हरित आणि शांत परिसरामुळे आज त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करतात, ही खसाळा गावाच्या बदलत्या मानसिकतेची खूण आहे. गावातील तरुणांसाठी अभ्यासिका, वाचनालय, सौरऊर्जा ग्राम अशा उपक्रमांवर भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात १०० टक्के ऊर्जाग्राम म्हणून गावाची ओळख करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
जयश्री इंगोले, सरपंच, खसाळा

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला अधिक बळकट करू ः राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त सदस्य सुभाष पारधी

divyanirdhar

कॉग्रेसला बर्वे तर भाजप-शिवसेनेला पारवेची काळजी; साडे सहा लाख बौद्धांचा वाली कोण?

divyanirdhar

असंघटितांसाठी कामगार संघटनांनी एकसंध व्हावे ः सुभाष लोमटे

divyanirdhar

गोसेखुर्दचे `बॅक वॉटर’ शेतशिवारात; उभी पिके आली पाण्याखाली, शेतकऱ्यांची उडाली झोप

divyanirdhar

माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या दौऱ्याने कॉंग्रेसमध्ये उत्साह

divyanirdhar

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ः महाविद्यालयावर कारवाईची राष्ट्रवादीच्या नेत्या सोनम उके यांची मागणी

divyanirdhar