हिंगणघाट ः दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे निसर्गाला वाचविण्यासाठी झाडे लावणे व ती जगविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
ते आधार फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर भव्य स्वरुपात संपन्न झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी चंद्र्भान खंडाईत, पोलिस निरीक्षक संपत चव्हाण, मुख्याधिकारी अनिल जगताप, जेष्ठ मार्गदर्शक वामनराव खोंडे, वास्तु विशारद रूपाली मिटकर, नारायण सेवा मित्र परिवार चे अध्यक्ष महेश अग्रवाल,बुरकोणी चे सरपंच विजय बोरकर, आधार फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले, कार्यकारी अध्यक्ष पराग मुडे, पर्यावरण समितीचे प्रमुख चंद्रशेखर निमट आदी मान्यवर हजर होते.
पुढे बोलतांना खासदार तड्स यांनी आधार फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. खंडाईत यांनी सुद्धा पर्यावरणाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. इतर मान्यवरानी याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे संचालन निलेश गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जगदीश वांदिले यांनी करून आभार माधुरी विहीरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकरराव चाफले, डॉ. शरद मद्दलवार, लक्ष्मीकांत धार्मिक, डॉ.प्रा.शरद विहीरकर, तुषार लांजेवार, डॉ. संजय हिवरकर, प्रा.गजानन जुमडे, प्रा. गिरधर काचोळे, डॉ.प्रा.राजू निखाडे, गिरीधर कोठेकर, राजेश कासवा, सुनिल डांगरे, सचिन येवले, राहुल सोरटे, सुनील भुते, बच्चू कलोडे, डॉ. विठ्ठल घिनमिने, सुरेश गुंडे, अरविंद दहापुते, डॉ.नरेश सातपुडके, महिला समितीच्या मायाताई चाफले, वीरश्री मुडे, अनिता गुंडे, वैशाली लांजेवार, ज्योती धार्मिक, शुभांगी वासनिक, ऍडव्होकेट प्रतिभा भानखेडे, डॉ.अनिता मनवर, सुचिता सातपुते, मीनाक्षी फुलबांधे, प्रणिता तपासे, निता गजबे, शितल गिरधर, स्मिता मुडे, अनुराधा मोटवाणी आदींनी परिश्रम घेतले.
दरवर्षी पाचशे झाडे जगविण्याचा आमचा संकल्प.
आधार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आम्ही किमान पाचशे झाडे लावून ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. यासाठी आधार फाऊंडेशन आणि संघटनेचे सदस्य स्वतः च्या किंवा कुटुंबियांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झाडे लावण्याचा उपक्रम पार पाडीत असतात.
अतुल वांदिले,संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन