Divya Nirdhar
Breaking News
करमणूकठळक बातम्यानागपूर

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

दिव्य निर्धार प्रतिनिधी

नागपूर ः महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन मुक्ती आंदोलन, महिला आघाडीच्या वतीने काटोल येथे बुद्धभीम गीताचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रबोधनकार आणि गायिका क्रांती मीनल यांनी गायलेल्या गीतांना श्रोते मंत्रमुग्ध झाले. शेकडो लोकांनी त्यांच्या गायनाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे होते. उद्घाटन पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी केले. तर कार्यक्रमाला भंते धम्मसेन महाथेरो, संदीप मेश्राम, प्रकाश थोरात, संगीतबाबू इंगळे, महेंद्र सातपुते, भगवान चांदेकर प्रमुख पाहुणे होते. यावेळी भीमबुद्ध गीतांचा दुय्यम मुकाबला झाला. गायक क्रांती मिलन आणि सुभाष कोठारे यांनी एकापेक्षा एक अशी सुरेल गीते गायली. गायिका क्रांती मिलन यांच्या प्रत्येक गीताला टाळ्यांचा कडकडाट झाला. क्रांती मिलन ह्या गेल्या आठ ते दहा वर्षांपासून गायकीच्या क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहे. लोकांच्या पसंतीला उतरलेल्या महाराष्ट्रातील त्या ख्यातनाम गायक आहेत. विदर्भातील गावागावांमध्ये त्‍यांच्या भीमबुद्ध गीतांचे कार्यक्रम सादर करण्यात आले आहेत. बहुजन मुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे यांनी आपल्या भाषणात आंबेडकरी समाजाला एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले. संघटनेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात असून संघटनेचे कार्य जोमात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला विक्रमभाऊ ताटे, वैशालीताई ठाकूर,जितुभाऊ तुपकर, सुभाष कोठे, समीर उमप, किशोर गाढवे, देविदास कठाणे,मिलिंद देशमुख, दिगांबर डोंगरे, बबलू बागडे, प्रशांत शेन्डे, महादेवराव ईखार, महेन्दभाऊ गायकवाड, निकभाऊ नाईक, दिलीपभाऊ ठाकरे,

अरविंद टाकळखेडे, कृष्णाजी इखार,अनिलजी मुंघडा, नामदेव वैद्य, त्र्यंबक गमे, अनिल गुडघे,देवराव राऊत,नागोराव ईखार, विजय वैद्य, विनोद नागपुरे,ईश्वर पवार, विनोद चव्हाण, सतीश यावलकर, प्रकाश मोहोड, नीलकंठ भोसकर, रमेश ढगे, भगवान गायकवाड , राजू बांगर, रामभाऊ बागडे , अमोल सोमकुंवर , उत्तम बागडे , बाबूराव तागडे , मनोहर तागडे ,शुद्धोधन गराडकर, स्वनित महेतकर,प्रफुल तायवाडे,सादिल गजभिये, साहिल वाघ, राहुल बागडे , शरद कडबे , डायमंड सोमकुंवर, शेखर गोंडाणे,आशाताई मेंढे, लताबाई जाधव, मंदा मेश्राम, संगीता वानखेडे, सुनीता दाभने, मीराबाई डोंगरे, हिराबाई चक्रपाणी,ओमप्रकाश गोडबोले लतीफ शेख, रामदास हिवराळे,सिद्धार्थ कुकडे, प्रभाताई सोमकुंवर, अल्का सोमकुंवर,मीरा पाटील, मंगला सोमकुंवर, सविता शंभरकर, मंगला ढोणे, अनुसया तागडे, शीला राऊत, सुजाता पाटील, प्रणिता वानखेडे,वनीता पाटील, सुरेखा मनकवडे, शीला शेन्डे, विमल उईके, लता शेन्डे, संगीता पाटील, अहिंसा सोमकुंवर, हेमलता गौरखेडे, सुजाता पाटील, प्रणिता खोडे पुनम रोकडे, रूपाली डफर, मंगला दुर्गे, हर्षला मोहळे, माधुरी तराडे, रोशनी बारंगे, सुजाता रक्षित,शिवानी बेहणीया, उज्वला सोमकुंवर यांनी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

 घोटाळ्यात मनपा अधिकार्‍यांच्या सहभागाची शंका, राकाँच्या प्रदेश सचिव आभा पांडे यांचा आरोप

divyanirdhar

जीएसटी परिषदेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल

divyanirdhar

प्रतिबंधित बियाणे खरेदीपासून शेतकऱ्यांनी राहावे सावध.. कोणी केले आवाहन…वाचा

divyanirdhar

सोनिया गजभियेः द वुमेन लिडेर ऑफ द इयर

divyanirdhar

राष्ट्रवादीत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंनी ही घेतली जबाबदारी…

divyanirdhar

बार्टीच्या योजना बंद नाहीच; सचिव भांगेंना बदनाम करण्याचे षडयंत्र

divyanirdhar