Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरराजकीयविदर्भ

नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा पालकमंत्री राऊत यांचा दावा

दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
नागपूर : मार्च २०२० मध्ये नागपुरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ९८९ वर पोहोचली. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. रुग्णांची संख्या तीन हजार ४५४ एवढी होती. मात्र दुसरी लाट ही नागपूरसाठी अधिक घातक ठरली. मार्च महिन्यात रुग्ण संख्या चार हजार ६८२ तर एप्रिल महिन्यात सात हजार ६३२ वर पोहोचली होती. दरम्यान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या आरोग्य सेवेत आठपटीने वाढ झाल्याचा दावा केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आरोग्य सुविधांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य झाले. नागपुरातील दवाखान्यांमधील खाटा, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेडच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आठपटीने म्हणजेच ९८९ बेडवरून सात हजार ७३० बेडची वाढ झाली आहे. त्यामुळे दुसरी लाटेत केवळ एका महिन्यातच नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरात केवळ ९८९ रुग्णांसाठी बेड नागपुरात होते. यात आठपटीपेक्षा अधिक बेडची आता भर पडली ३० मे २०२१ मध्ये बेडची संख्या सात हजार ७३० झाली. एप्रिल २०२० मध्ये नागपुरात केवळ ८०५ ऑक्सीजन बेड होते. आता ऑक्सीजन बेडची संख्या चा हजार ८१० एवढी आहे. आयसीयूमध्ये बेड मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी व्हेंटीलेटरची संख्या केवळ ८७ होती. आता ५७९ एवढे उपलब्ध आहेत. याच प्रमाणे केवळ ५८ मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होता. आता १६० मेट्रीक टन ऑक्सीजनची निर्मिती होत आहे.

येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे व त्या भक्कम करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. यासाठी सर्व अधिकारी व आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले.
-नितीन राऊत, पालकमंत्री, नागपूर

संबंधित पोस्ट

स्थानिकमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंला पुन्हा हुलकावणी?, मोहभंग होण्याची शक्यता

divyanirdhar

सरकार काय मेल्यावर पैसे देईल़, रमाई घरकुल योजनेचा निधी आटला़

divyanirdhar

पहिल्या फळीतील ४३ टक्केच कर्मचाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा

divyanirdhar

राजोला जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचाच होईल विजय; राहुल घरडे यांचा विश्वास

divyanirdhar

सरकार बाराबलुतेदारांना उपाशी मारणार काय?, डी.डी. सोनटक्के यांचा सरकारला सवाल

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट करण्याचा जातीय संघटनांचा कट;  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पदमुक्तीवरून राज्यात आक्रोश

divyanirdhar