Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय

रिपब्लिकन पार्टी (आ.) च्या रेखा गोंगले, अमोल वानखेडे यांची प्रचारात आघाडी

नागपूर ः राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी केले आहे. नागपूर जिल्ह्यात कामठी, दक्षिण नागपूर, सावनेर आणि हिंगणा या चार मतदारसंघात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर रिपब्लिकन पार्टी (आ.) च्या रेखा गोंगले, अमोल वानखेडे यांची प्रचारात आघाडी घेतली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) कटिबद्ध असून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर जिल्ह्यातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात रेखा गोंगले निवडणूक लढवीत असून त्यांना प्रचारात आघाडी घेतली आहेत. शनिवारी दिघोरी परिसरात त्यांनी प्रचार केला. त्याला मतदारांना भरघोस प्रतिसाद दिला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी, उमेदवार रेखा गोंगले, कामठीचे उमेदवार अमोल वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर आहे. त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन याप्रसंगी मतदारांना करण्यात आले. दिघोरी, बेलदारनगर, वैभव नगर, सर्वश्रीनगर, दिघोरीसह परिसरात प्रचार करण्यात आला. तर कामठीचे पक्षाचे उमेदवार अमोल वानखेडे यांनी नरसाळा, हुडकेश्वर परिसरात प्रचार केला. त्यांना मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अमोल वानखेडे यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. तसेच कामठी युवा मतदाराला निवडून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी, दक्षिण नागपूरच्या उमेदवार रेखा गोंगले उपस्थित होत्या. अमोल वानखेडे यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर असून ती बटन दाबण्याचे आवाहन केले. हिंगणा विधानसभा मतदारसंघात परवेझ शेख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारसंघ पिंजून काढला असून गावागावांत त्यांना प्रतिसाद मिळत आहे.त्यांचे निवडणूक चिन्ह टीव्ही आहे. तर सावनेरमधून भीमराव डोंगरे हे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही गावागावांत प्रतिसाद मिळत असून विरोधकांना धडकी भरली आहे. त्याचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर आहे. जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी हे चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचार करीत आहेत. चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा दावा त्यांनी प्रचारसभांमध्ये केला आहे.

रेखा गोंगले यांचा विजयाचा दावा

दक्षिण नागपूरच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या अधिकृत उमेदवार रेखा गोंगले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी फिरून मतदारांच्या प्रत्यक्ष भेट घेत आहे. त्यांच्या प्रचार रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचारामुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे. रेखा गोंगले ह्या उच्च शिक्षित असून महिला उमेदवार म्हणून त्या प्रथमच निवडून लढवीत आहेत. तसेच त्यांना सामान्य लोकांच्या समस्यांची जाण आहे. महिला आणि गोरगरिबांच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहेत. यामुळे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

अमोल वानखेडे यांची प्रचारात आघाडी

कामठी विधानसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या अधिकृत उमेदवार अमोल वानखेडे यांना ग्रामीण भागातील मतदारांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून युवा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. अमोल वानखेडे हे कृषी पदवीधर असून शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. निवडून आल्यानंतर सोयाबीनला १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच कामठी, मौदा, आणि नागपूर ग्रामीणमधील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन अमोल वानखेडे यांनी मतदारांना केले आहे.

संबंधित पोस्ट

परिटांचे नेते डी.डी. सोनटक्के म्हणाले, संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून न्याय द्या

divyanirdhar

राणे गरजले.. कोरोनातही मलिंदा खाणारे हे भ्रष्ट सरकार

divyanirdhar

बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट करण्याचा जातीय संघटनांचा कट;  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पदमुक्तीवरून राज्यात आक्रोश

divyanirdhar

म्हसली येथील ग्रामपंचायतीत घोळच घोळ

divyanirdhar

डी.डी. सोनटक्के, समिती प्रमुख आशीष कदम यांच्या नेतृत्त्वात धोबी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा,६० वर्षांनंतर धोबी(परीट)महासंघाच्या लढ्याला यश

divyanirdhar

पार्टीतील वाद जीवावर बेतला…दगडाने ठेचून केली हत्या

divyanirdhar