Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यामुंबईविदर्भसंपादकीय

बौद्धांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना आता तरी ओळखा!

प्रिय बौद्ध बांधवांनो !
बघा पटत का. बघा स्वाभिमान जागरूक होतो का! झाला तर लढायला तयार व्हा!अशक्य काही नाही !
आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा विवेकवादी,परिवर्तनवादी चळवळीची मशाल जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम बाबासाहेबांच्या आपण बौद्ध अनुयायांनी केलं. या देशात शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे विचार पेरण्याच काम आपण बौद्धांनी केलं. आपण अहोरात्र केलेल्या परिवर्तनवादी मंथनामुळे महाराष्ट्रात प्रबोधनाचा विचार जागरूक झाला. आपण महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून ज्वलंत केलेला परिवर्तनवादी चळवळीचा अग्नी बहुजनांच्या घराघरांत पोहोचला. त्यामुळेच केवळ माळ्यांच्या घरात फुले अन् मराठ्यांच्या घरात शाहू जिवंत झाले. अन् तुकोबांचे खरे दर्शन महाराष्ट्राला झाले. एवढे मोठे योगदान आपल्या समाजाने महाराष्ट्राला दिले. पण याची काय किंमत आपण मोजली, याचा विचार करण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
जागृतीचा अग्नी सनातन्यांचा मुळावर उठला, अन् त्यांनी हळूहळू आपल्याला संपवणे सुरू केलं. बौद्ध अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक, बौद्ध राजकारण्यांना दुय्यम वागणूक, बौद्ध कार्यकर्त्या दूर ठेवणे, समाजाला साध्या साध्या प्रश्नासाठी मोठ आंदोलन उभारायला भाग पाडणे, समाजातील मोजक्या लोकांना पद पैसा प्रतिष्ठा देऊन फितूर करून त्यांच्या हातून विरोधाचा अग्नी कमकुवत करणे इत्यादी प्रकार सुरू झाले. आणि आज बौद्ध समाजाची अशी दयनीय अवस्था झाली आहे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातून हा समाज हद्दपार झाला आहे. जवळपास ८० लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व अत्यल्प असे आहे. उलट मातंग चर्मकार अशा आपल्या भावंडांना आपल्याच विरुद्ध तयार करून सर्व आरक्षण आणि इतर लाभ केवळ बौद्धांनी लाटले, असा प्रचार मागील पाच वर्षांपासून जोरदार रीतीने सुरू असून भविष्यात बौद्धांच्या विरोधात भांडण लावून मोठी दरी निर्माण करण्याचं षड्यंत्र महाराष्ट्रात सुरू आहे. येत्या काळात बौद्धांना पुन्हा अस्पृश्य बनवण्याचे षड्यंत्र जोरात सुरू असून बौद्ध समाज मात्र पूर्णपणे गाफील आहे. मनात अस्वस्थता असली समाजाला या सगळ्याची पूर्णपणे जाणीव अजूनही झाली नाही.

इतिहास साक्षी आहे. आपले नागवंशीय शूर पूर्वजांनी आर्यांना शेवटपर्यंत कडवा विरोध केल्याने,सनातन्यांचे धार्मिक अवडंबर नाकारल्याने, बुद्धाची धम्माची कास शेवटपर्यंत न सोडल्याने आपल्या पूर्वजांना अस्पृश्य करण्यात आले होते आज तो इतिहास पुन्हा घडण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. केवळ राजकीय सत्तेच्या मागे हपापल्यासारखा लागल्याने आपला संपूर्ण समाज सत्तेचा भुकेला झाला आहे. पुणे कराराची मेख ही आपल्या राजकीय स्वातंत्र्यावर कायम असल्याने आपला १० ते १५ टक्के समाज काही करू शकत नाही हे वास्तव असूनही आजही आपण राजकीय सत्तेचा हव्यास सोडत नाही हे मोठे दुर्दैव आहे. बाबासाहेबांनी आपल्या हाती दिलेले धम्माच रत्न आपण कधी हात उघडून बघितलेच नाही, उलट एका हाती धम्म असताना दुसऱ्या हाती निळा झेंडा घेऊन घोषणा करत पुढे जाण्यातच आपण धन्यता मानली. राजकारणाकडे पाहूच नये असे मी म्हणणार नाही. पण अतिरंजित राजकीय महत्वाकांक्षा समाजाला धोक्याची आहे. काही मोजक्या लोकांवर राजकारण विश्वासाने सोडून आपण धम्मकारण व अर्थकारण यावर भर दिला असता तर समाजाची ही गोची झाली नसती हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही. आज आरपीआयचे ५२ गट आहेत नवीन युवकांना रोज नवीन गट स्थापन केले तरी समाजाचे नियंत्रण नाही. आपले प्रस्थापित राजकीय पक्ष अस्ताव्यस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण अपेक्षित राजकीय परिणाम किती गाठू शकतो हे सांगण्याची गरज नाही. पण खरा चिंतेचा विषय हा आहे की आपल्याच माणसाच्या विरोधात व्यवस्था आपलीच माणसे भिडवते, उलट याचं चांगले जस्टिफिकेशन देते आणि आपला नेतृत्व हीन समाज दिशाहीन होऊन चारही दिशांना धावतो यापेक्षा दुर्दैव काय असेल.

अमरावतीत बळवंत वानखेडे या मुख्यधरेतील पक्षात प्रतिनिधित्व भेटलेल्या एकमेव बांधवांच्या विरोधात मत खाण्यासाठी आनंदराज आंबेडकर उभे राहतात. प्रकाश आंबेडकर केवळ उमेदवार पाडण्यात धन्यता मानतात. कवाडे जातात गडकरी यांच्या प्रचाराला, भीमकन्या म्हणवणारी सुलेखाताई सनातन्यांची खुलेआम हस्तक
होते. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत लढा असे म्हणणारी महाविकास आघाडी रामटेकमध्ये किशोर गजभिये यांनी मागील निवडणुकीत केवळ २० ते २५ हजार मतांनी निवडणूक हरलेल्या माजी सनदी अधिकारी असलेल्या बौद्ध बांधवाला उमेदवारी नाकारून केवळ हरण्यासाठी भाजपने पेरलेल्या काही अस्तित्व नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी देतो. अशी विचित्र परिस्थिती समोर पाहून आधीच नेतृत्वहीन असलेल्या समाजाची किती गोची होते हे कुणाला सांगायचं.

एकंदरीत परिस्थिती अशी आहे की बौद्धांना पुरोगामी म्हणवणारे व प्रतिगामी असलेले कुणीच स्वीकारत नाही हे वास्तव आहे. आणि आम्ही हे तत्काळ समजून घेतलं नाही तर मरण अटळ आहे हे ही वास्तव आहे. बंधूंनो नेतृत्वहीन समाजाला कधीही ठेचता येते हे प्रस्थापितांना चांगले ठावूक असून तुम्हाला ही मंडळी नेतृत्वहीन करायला निघाली. पुढे नक्कीच घातपात आहे हे वेळीच ओळखा .
तत्काळ आपल्यातील नेतृत्व ओळखा. आपण सगळे प्रबुद्ध आहोत म्हणून नेतृत्वगुण सर्वात आहेतच पण तरीही संसदेत आपलं प्रतिनिधित्व करू शकणार नेतृत्व ओळखून त्यांना संधी द्या.
किशोर गजभिये या सक्षम,जबाबदार, पात्र समाज प्रतिनिधीसोबत प्रस्थापितांनी खेळ केला नसून तो आंबेडकरी बौद्ध समाजाशी केला आहे. बौद्ध आम्हाला चालत नाही हे ओरडून ओरडून व्यवस्था आम्हाला सांगत आहे. बंधूभगनिंनो हे ओळखण्याएवढे प्रबुद्ध आपण नक्कीच आहोत वेळ आहे. आता वेळीच संघटित चाल करण्याची. उठा जागे व्हा. संघटितपणे गनिमी कावा करा. अशक्य काहीच नाही.
मित्रांनो ही पोस्ट राजकीय नाही पण सद्यःस्थितीत तत्काळ हे करण्यासारखे आहे ते करावे. भविष्यामध्ये धम्म व अर्थ यावर समाजाने लक्ष द्यावे यातच उत्थान आहे. पुढील लेखात याबाबत सविस्तर लिहिलंच. सध्या आपण रामटेकमधून गजभिये व अमरावतीतून बलवंत वानखेडे या बौद्ध बांधवांना संसदेत पाठवूया. सर्वसामान्य बंधूभागींनीं कामाला लागल्यास हे सहज शक्य आहे. आता किंतू परंतु, विसरा व कामाला लागा.

कृती आराखडा
१. रामटेक मतदारसंघात व अमरावतीत आपली प्रत्येकी ६ लाख मते आहेत.
२. ⁠सर्वांनी १०० टक्के मतदान करायचं.
३. ⁠सर्वांनी किशोर गजभिये व बलवंत वानखेडे यांना मत द्यायचं.
४. ⁠सर्व पक्षातील आपल्या बांधवांनी वरवर पक्षाचे आणि आतून समाजाचे काम करायचे.
५. ⁠आपल्या संपर्कातील ओबीसी वर्गातील १० मित्र मंडळींना रोज फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून माजी सनदी अधिकारी कसा योग्य उमेदवार आहे व इतर दोघेही कसे उपरे आहेत हे समजवायचे.
६. ⁠मागील खासदार तुमाने यांनी काहीच न करता १० वर्षे खाल्ली हे सांगायचं.
७. ⁠मुस्लिम व एसटी बंधूंना भेटून गजभिये यांना मते देण्यासाठी सांगायचे.
८. ⁠मविआ व महायुती यांची टक्कर काट्याची होणार यात आपण संघटित राहिलो आणि वरील कृती आराखडा अमलात आणला तर आपला बौद्ध प्रतिनिधी संसदेत नक्की जाईल.
९. ⁠बौद्ध विहारात याबाबत चर्चा करा आणि संघटितपणे कामाला लागा.
१०. ⁠ज्यांना शक्य आहे त्यांनी चार पाचच्या गटाने स्वखर्चाने मतदार संघात फिरावे.
११. ⁠सर्वात महत्त्वाचे-हा मेसेज सर्व बौद्ध बांधवांना फक्त पाठवा.

संबंधित पोस्ट

कॉंग्रेस नेत्यांना रामटेकमध्ये बौद्धांची ‘एलर्जी’

divyanirdhar

मेडिकलमधील एमआरआयपाठोपाठ सीटी स्कॅन बंदः म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची गर्दी

divyanirdhar

हुकुमचंद आमधरे : शेतकरी पुत्र ते शेतकरी नेता

divyanirdhar

जिल्हा परिषदेचा दावा फोल, पाणीटंचाईची कामे अपूर्णच

divyanirdhar

रिपब्लिकन विचारधारा स्वीकार करे : डा मोहनलाल पाटील

divyanirdhar

हे काय… 60 हजार खुराकीसाठी अपुरे

divyanirdhar