Divya Nirdhar
Breaking News
daru
गुन्हानागपूरविदर्भ

“अर्थव्यवस्थे’चा भार मद्यपींच्या खांद्यावर, लाखोंची ढोसली दारू

यवतमाळ :  राज्याला सर्वाधिक महसूल मद्यविक्रीतून मिळतो. “अर्थव्यवस्थे’चा भार मद्यपींच्या खांद्यावर, असे जोक्‍स गेल्या एक वर्षापासून सातत्याने व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात बनावट दारू मोठ्या प्रमाणात विकली गेली. हा भार अनेकांच्या खिशाला पेलवत नसल्याने अनेकांनी गावठी प्राशन करून शौक पूर्ण केला. इतकेच काय तर, चक्क सॅनिटायझर पिण्यापर्यंत मजल गेला.

कोरोनाचा संसर्ग वाढायला लागताच एप्रिल महिन्यात कडक निर्बंध लादण्यात आले. त्यात दारू दुकानांना टाळे लावण्यात आल्याने मद्यपींना चढ्यादराने दारू विकत घेऊन शौक पूर्ण करावा लागला. मात्र, अवघ्या काही दिवसांत घरपोच डिलिव्हरीची मुभा मिळताच नोंदणी करण्यासह “पार्सल’ आणण्यासाठी मद्यपी सकाळीच घराबाहेर पडत असल्याचे चित्र बघावयास मिळते. या वर्षी तर वणीत सॅनिटायझर पिल्याने आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. कडक निर्बंधात अवैध दारूविक्रेत्यांना पुन्हा सुगीचे दिवस आलेत. बनावट असलेली दारू नेहमीच्या भावापेक्षा दुप्पट दराने विकली गेली. 27 एप्रिलपासून “होम डिलिव्हरी’च्या गोंडस नावाखाली मद्यविक्रीला मुभा देण्यात आली. बारमध्ये बसून दारू प्राशन करण्यास मनाई आहे. ग्राहकांनी कोणत्याही दुकानात न जाता घरूनच संबंधित फोनवर संपर्क साधून दारू मागवावी, असा उद्देश होता. मात्र, थेट घरी दारू आल्यास “राडा’ होईल, या भीतीने चक्क वाइन शॉपसमोर गर्दी करणे सुरू केले. दुकानाबाहेर आजूबाजूला उभ्या असलेल्या ग्राहकांना मागणीनुसार दारू उपलब्ध होत आहे. त्यामुळे मद्यपींची चिंता काही प्रमाणात निकाली निघाली आहे. 27 एप्रिल ते 25 मेपर्यंत सर्वाधिक चार लाख 85 हजार देशी, तर त्यापाठोपाठ विदेशी अशी एकूण सहा लाख 71 हजार 53 होम डिलिव्हरीची नोंद करण्यात आली आहे.

घरपोचची आकडेवारी

  • वाइन शॉप – 93,754
  • बिअर बार -74,463
  • बिअर शॉपी -17,344
  • देशीदारू-4,85,489

कोणत्याही परवानाधारकांना दुकानातून थेट ग्राहकांना दारूविक्री करण्यास मनाई आहे. होम डिलिवरीद्वारे ग्राहकांना दारूविक्री केली जाते. कुठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पथकाद्वारे तपासणी केली जाते. पुसद येथील एका बिअरबारवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही कोणी जुमानत नसेल तर मोठी कारवाई करण्यात येणार आहे.

-सुरेंद्र मनपीया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, यवतमाळ.

संबंधित पोस्ट

divyanirdhar

पासपोर्टच्या धर्तीवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; बार्टीने सादर केला सामाजिक न्याय विभागाला प्रस्ताव

divyanirdhar

उमरेडवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; मुख्याधिकार्‍यांनी केली केंद्राची पाहणी

divyanirdhar

व्यांगाच्या शाळांकडे सरकारचे दुर्लक्ष; सातवा वेतन आयोग नाही; विविध प्रश्न जैसे थे

divyanirdhar

स्वच्छतेचे खरे अग्रदूत संत गाडगेबाबाच; डी.डी. सोनटक्के, गाडगे बाबा स्वच्छता अभियान कागदावरच का?

divyanirdhar

बाबासाहेबांच्या विचारांवर नागपूर महानगर पालिकेने फिरविला बुलडोजर

divyanirdhar