Divya Nirdhar
Breaking News
RTMNU
ठळक बातम्यानागपूरमहाराष्ट्रविदर्भ

विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना; परीक्षा अर्ज अडवू नका

नागपूर : जरी विद्यार्थ्यांकडे प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क थकित असेल तरीही विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्याकरिता अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी प्राचार्य, विभाग प्रमुखांनी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व शिक्षण शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्याची सुविधा द्यावी. तसेच परीक्षेचे अर्ज करण्यास विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला निवेदन सादर करीत मागणी केली होती.

कोरोनामुळे पालकांची आर्थिकस्थिती बिकट झाली आहे. अनेकांना प्रवेश शुल्क भरणेही अडचणीचे होत आहे. याशिवाय ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही महाविद्यालयांकडून इतर शुल्काची आकारणी केली जात आहे. याविरोधात एनएसयुआय, अभाविप आणि भाजयुमोने विद्यापीठाला निवेदन देत शुल्क भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी केली होती. विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यापीठ अनुदान आयोग व राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषद यांच्याकडे विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्कासंदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत. आयोगाच्या संदर्भाकित पत्रानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे प्रलंबित, थकित असलेल्या प्रवेश व शैक्षणिक शुल्काकरिता सहानुभूतिपूर्वक विचार करावा. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक घडी विस्कळित झाल्यामुळे प्रलंबित शुल्काकरिता विद्यार्थ्यांना अडचणींत आणू नये. राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संदर्भाकित पत्रानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन ते चार हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात यावी. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय परीक्षेचे आवेदन पत्र भरता येणार नाही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जरी विद्यार्थ्यांकडे प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क थकित असेल तरीही विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्याकरिता अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी प्राचार्य, विभाग प्रमुखांनी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

असंघटितांसाठी कामगार संघटनांनी एकसंध व्हावे ः सुभाष लोमटे

divyanirdhar

बाबासाहेब ः केदार ते सहकार

divyanirdhar

भाजपच्या ओबीसी विभागाने दिला गरजूंना मदतीचा हात

divyanirdhar

चोर म्हणाला… साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत!

divyanirdhar

बाबासाहेबांच्या विचारांवर नागपूर महानगर पालिकेने फिरविला बुलडोजर

divyanirdhar

बार्टीला आयएसओ ः धम्मज्योती गजभिये यांच्या कार्याला मिळाली झळाळी

divyanirdhar