Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्याबिझनेसमुंबई

‘अनामित्रा प्रॉपर्टीज’च्या संचालकाकडून मेहता यांना सदनिकेची विक्री

मुंबई : ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता यांना नरिमन पॉइंट येथील सदनिका (अपार्टमेंट) हे अनामित्रा प्रॉपर्टीज प्रा. लि.चे संचालक निखिल केतन गोखले यांनी विकल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील एबीआयएल समूहाचे अविनाश भोसले यांची यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केली असून नोकरशहांच्या घरांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर व्यावसायिक इमारत बांधल्याचे प्रकरण होते. त्यात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केली होती.
गोखले हे एबीआयएल समूहाच्या सात आस्थापनांवरील सदस्य आहेत. कंपनी नोंदणी निबंधक कार्यालयाच्या डिसेंबर २०२० मधील माहितीनुसार गोखले यांना अनामित्रा प्रॉपर्टीजच्या संचालक मंडळावर ऑक्टोबर २००८ मध्ये नेमण्यात आले होते.
त्यावर त्यांनी त्यांचा एबीआयएल समूहाचा ई-मेल पत्ता दिला आहे. गोखले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनामित्रा प्रॉपर्टीजशी काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपण कराबाबतच्या नोटिसांना उत्तरे देऊ शकत नाही. अधिकृत नोंदीनुसार गोखले यांनी नरिमन पॉइंट येथील समता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, नरिमन पॉइंट ही सदनिका मेहता यांना ५.३३ कोटी रुपयांना विकण्यासाठी परवानगी मागितली होती. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना १ ऑक्टोबर २०२० रोजी या सदनिकेची विक्री करण्यासाठी दिलेला आदेश मिळाला .
गोखले यांची ही सदनिका १०७६ चौरस फुटांची आहे. गोखले यांनी सदनिका विकण्यासाठी अर्ज केला होता व हस्तांतर शुल्क म्हणून १६ लाख ८० हजार ४०० रुपये भरले होते. तो आदेश समता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे आहे. समता सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा सरकारने न्यायाधीशांच्या घरकुलांसाठी सवलतीच्या दरात दिली होती. तेथे ११ एप्रिल १९८६ रोजी न्या. शरद मनोहर यांना जी सदनिका देण्यात आली होती, तीच आता मेहता यांच्या नावावर आहे.
मनोहर यांनी ही सदनिका त्यांचा मुलगा आशीष मनोहर याच्या नावावर २ सप्टेंबर २००१ रोजी केली होती. नंतर गोखले यांनी २५ जून २००९ रोजी ती घेतली. गोखले यांनी मेहता यांना ऑक्टोबर २०२० मध्ये ५.३३ कोटी रुपयांना विकली. ७ जुलै रोजी प्राप्तिकर खात्याने अनामित्र प्रॉपर्टीजला नोटीस जारी केली असून सदर मालमत्ता ही बनावट कंपनीच्या मार्फत घेतली असून ती बेनामी मालमत्ता आहे.
२००९ मध्ये या वास्तूचा ४ कोटींचा व्यवहार झाला होता तो बेनामी झाला होता, कारण त्याचे दोन शेअरधारक हे पात्र नव्हते. प्राप्तिकर खात्याने म्हटले आहे, की दोन शेअरधारक हे वेगळेच असून त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला. नोटिशीत गोखले यांच्या नावाचा उल्लेख नाही. आता या मालमत्तेवर प्राप्तिकर खात्याने टाच आणली असून बेनामी व्यवहार कायद्यान्वये कारवाई केली आहे. याचा अर्थ मेहता यांना आता त्रयस्थ पक्ष म्हणून अधिकार मालमत्तेवरील टाच उठवल्याशिवाय घेता येणार नाहीत. मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की आमचा व्यवहार कायदेशीर असून बाजारदराने आपण पैसे दिले होते. मी करदाता आहे. ही मालमत्ता कुठल्या पैशातून इतरांनी घेतली हे मला माहिती नाही.

संबंधित पोस्ट

राजकारणासोबतच प्रबोधनाची समाजाला गरज; अखिल तिरळे कुणबी समाज पदाधिकाऱ्यांचा चर्चासत्रात सूर

divyanirdhar

सावित्रीच्या लेकींनी जिजाऊचा घ्यावा आदर्श ःडॉ. नूपुर नेवासकर

divyanirdhar

मागासवर्गीयांवरील अन्यायाविरोधात ‘हल्ला बोल’आंदोलन; नागपूर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दिल्लीला रवाना ः जिल्हाध्यक्ष राहुल घरडे

divyanirdhar

…तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

divyanirdhar

बाबासाहेबांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी कटिबद्ध; बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचा निर्धार

divyanirdhar

सर्वच प्रकारची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा निर्णय

divyanirdhar