Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरविदर्भ

नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला

नागपूर : उड्डाणपुलाचा भाग कोसळला असला तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नागपूरच्या कळमना-पारडी एच बी टाऊन मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचे काम बंद होते. त्याचवेळी रस्त्यावर जास्त वाहतूक नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळाच्या एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने भाज्यांचे आणि फळांचे ट्रक्स या भागातून जातात. मात्र साडेनऊ वाजता ट्रकची वाहतूक तिथून सुरू झाली नव्हती. त्यामुळे ही जीवित हानी टळली. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचा सेगमेंट या ठिकाणी रस्त्यावर खाली कोसळला आहे, त्या ठिकाणी त्याच्या इम्पॅक्टमुळे काँक्रीट रोड वरही मोठा खड्डा पडला आहे. दुर्घटनेनंतर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी पोहोचले. दुर्घटनेची तांत्रिक दृष्टिकोनातून तज्ञांकडून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करू अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

नितीन गडकरी यांनी प्रशासनाला केले सावध म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी रहा सावध

divyanirdhar

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

divyanirdhar

राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ जुलै रोजी निर्दशने

divyanirdhar

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

divyanirdhar

आदिवासींच्या हक्कासाठी आजन्म लढा देण्याची यांनी केली तयारी…वाचा

divyanirdhar

खासदार नवनीत राणांचे जातप्रमाणपत्र रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय…

divyanirdhar