हिंगणघाट :- संत तुकडोजी वॉर्ड प्रभाग क्र. ५ मध्ये अमृत योजनेची पाईपलाईन वेळोवेळी फुटत असल्याने तेथील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल आज मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हासचिव सुनील भुते यांच्या नेतृत्वात न.पा. मुख्याधिकारी अनिल जगताप यांना निवेदन देण्यात आले
संत तुकडोजी वार्ड, संकट मोचन हनुमान मंदिर परिसर, तांबुलकर ले आऊट मध्ये अमृत योजने अंतर्गतची पाईपलाईन असून ती विविध जागेवरून फुटून असल्याने त्या पाईपलाईन निघणाऱ्या गढूळ पाण्यामुळे चिखल तयार झाला असून त्यातून डेंगू चे मच्चर बाहेर पडत आहेत सदर रस्ता रहदारीचा असून त्या रस्त्याने लोकांची वर्दळ असते इथे साचलेल्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाल्याने येथून ये-जा करणाऱ्या लोकांपैकी बरेचसे नागरिक घसरून पडले त्यामुळे वॉर्डातील नागरिकांना गेल्या एक महिन्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
करीता हनुमान मंदिर परिसरातील पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने मंदिराचा संपुर्ण परिसर खराब झाला आहे सदर पाईपलाईन दुरुस्ती करिता आलेल्या जेसीबी मशीनने मंदिराचे कुंपन तथा परिसर खड्डेमय झाला असल्याने मंदिरात दर्शनाला जाने सुद्धा अवघड झाले आहे. परिसरातील लहान मुलांना खेळता सुद्धा येत नाही करिता या सर्व समस्या वर लक्ष घालून समस्यांचे निराकरण करावे व वॉर्डातील समस्या तात्काळ सोडवावे.वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, शहराध्यक्ष राजू सिन्हा, शहर उपाध्यक्ष प्रशांत एकोनकर, बाळूभाऊ निनावे, श्रावण चाफले, शंकर कोल्हे, अनिल मिर्झापुरे, समीर धनरे, छत्रपती कुकडे आदी वॉर्डातील रहिवासी उपस्थित होते.