Divya Nirdhar
Breaking News
राशीफल
करमणूक

धनलाभ होण्याची चिन्हं आहेत ः जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे?

*मेष राश‍ी भविष्य : सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. आजचा शुभ रंग – तांबडा.

*वृषभ राश‍ी भविष्य : बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. आजचा शुभ रंग – केशरी.

*मिथुन राश‍ी भविष्य: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – निळा.

*कर्क राश‍ी भविष्य : आज तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक यात्रा, प्रवास करण्याचा योग निर्माण होईल. कार्यालयात वातावरण चांगले असेल. आजचा शुभ रंग – पोपटी.

*सिंह राश‍ी भविष्य : व्यावसायिक क्षेत्रात आज तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. आजचा शुभ रंग – नारंगी.

*कन्या राश‍ी भविष्य : बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आज मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – मोरपंखी.

*तूळ राश‍ी भविष्य : भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – आकाशी.

*वृश्चिक राश‍ी भविष्य : वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. आजचा शुभ रंग – तपकिरी.

*धनु राश‍ी भविष्य : नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.

*मकर राश‍ी भविष्य: भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – केशरी.

*कुंभ राश‍ी भविष्य : आज वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग – निळा.

*मीन राश‍ी भविष्य : आज शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

संबंधित पोस्ट

बार्टीचे प्रशासन स्वच्छ करणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे केले पदमुक्त

divyanirdhar

‘क्रांती’च्या बुद्ध भीम गीताने श्रोते मंत्रमुग्ध; सुरेशबाबू डोंगरे यांचे एकतेचे आवाहन

divyanirdhar

गडचिरोलीत साकारला “जितेंगे हम”

divyanirdhar

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवेंवर निघणार टपाल तिकीट; बार्टीने केंद्र सरकारला पाठविला प्रस्ताव

divyanirdhar