Divya Nirdhar
Breaking News
ठळक बातम्यानागपूरमुंबई

सिलिंडरचा काळबाजार, अडीच हजारांवर गेले सिलिंडरचे भाव

नागप

विलास शेवाळे ः दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर: केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल बंद होत आहेत. गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि काळा बाजार केला तर थेट गुन्हा दाखल होणार आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी साठेबाजांना हा इशारा दिला आहे. नागपूर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे भरारी पथकं धाडसत्र राबवणार आहे. सध्या नागपूरात गॅस सिलिंडरचा कुठलाही तुटवडा नाही, अशी माहिती त्यांनी दिली. काही लोक भितीने गॅस सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. आम्ही पोलीस विभाग, अन्न वितरण विभागाची बैठक घेतली आहे. वेगवेगळ्या टीम नागपूर जिल्ह्यात धाडसत्र सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी अनेक ठिकाणी काळा बाजार सुरू असून एक हजार रुपयांचे सिलिंडर दोन हजार रुपयांना मिळत आहे.

गॅस सिलिंडरचा काळाबाजार
थांबवण्यासाठी नागपूरमधील अन्न पुरवठा विभागाने छापेमारी सुरू केली आहे. गॅस एजन्सी आणि गोडाऊनवर अन्न आणि वितरण विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. गॅस पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूरात अधिकार्‍यांच्या पथकाची धाडसी कारवाई समोर येत आहे. गॅस सिलिंडरचा अवैध साठा तपासण्यासाठी नागपूर अन्न पुरवठा विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मध्य पुर्वेत युद्धामुळे नागपूरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विनोद वाघदे आणि सागर बावरे यांनी दिला.

गॅसचा पुरेसा साठा, नागरिकांना मोठे आवाहन
जिल्ह्यातील गॅस पुरवठा बाबत काय परिस्थिती आहे याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे. घरगुती गॅस वापराचा साठा आपल्याकडे पुरेसा उपलब्ध आहे. घरगुती गॅससाठी कुठल्याही नागरिकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल गॅस वरूनच बंद असल्यामुळे ते आपल्या स्तरावर नाही. आपलं सगळं लक्ष घरगुती गॅस मिळणाऱ्या नागरिकांवर आहे. आपल्या जिल्ह्यात साधारणपणे दररोज तीन कंपनीच्या माध्यमातून २० हजार १३० गॅस सिलेंडरची विक्री होते.

दिघोरी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार
दिघोरी परिसरात घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, गॅस गोडाऊनसमोर दररोज लांबच लांब रांगा लागण्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच महिला, पुरुष तसेच वयोवृद्ध नागरिक रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हात तासन्तास प्रतीक्षा करूनही अनेकांना सिलिंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गॅस वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत आहे. वनिता मेश्राम, श्री. राऊत, श्री. खोब्रागडे यांसारख्या नागरिकांनी सांगितले की, “८ ते १० दिवसांपूर्वी नंबर लावूनही अजून सिलिंडर मिळालेला नाही.” काही नागरिकांना सलग दोन ते तीन दिवस रांगेत उभे राहावे लागते. मात्र, सिलिंडर संपल्याची घोषणा होताच त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येऊन रांगेत उभे राहण्याची वेळ येते. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलां आणि वयोवृद्धांना बसत आहे. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतरही हातात काहीच न लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काही जणांनी सांगितले की, कामधंदा सोडून गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे गंभीर परिस्थिती नागपूर शहरात निर्माण होऊ नये, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित पेट्रोलियम कंपन्या आणि शासकीय पुरवठा विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

अर्जुनी मोरगाव : पाणी समस्येवर काढा तोडगा नाही तर शिवसेना करणार आंदोलन

divyanirdhar

शेतकरी, कामगारांचे आधारस्तंभ राजानंद कावळे आता राजोला जिल्हा परिषदेच्या मैदानात

divyanirdhar

राज्यात विकास करणारे नाही तर वसुली करणारे सरकार आहेः माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे टीकास्त्र

divyanirdhar

नितीन गडकरी यांनी प्रशासनाला केले सावध म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी रहा सावध

divyanirdhar

काय चालले चंद्रपुरात? गुप्तधनासाठी केली वाघाची शिकार

divyanirdhar

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कोरोना रोखण्यासाठी हे केले उपाय…वाचा

divyanirdhar