Divya Nirdhar
Breaking News
आंतरराष्ट्रीयकरमणूकखेळठळक बातम्यानागपूरपुणेमुंबईराजकीयराष्ट्रीयरोजगारविदर्भ

बार्टीचे प्रशासन स्वच्छ करणाऱ्या धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे केले पदमुक्त

दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर,  ः  अनूसूचित जातीच्या विकासासाठी निर्माण केलेल्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील प्रशासकीय घाण स्वच्छ करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याला पदमुक्त करून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. धम्मज्योती गजभिये यांनी पदमुक्त करण्यात आले असून त्याच ठिकाणी गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याला पाठबळ देण्याचे काम सरकारने केले आहे. हे फारमोठे राजकीय षडयंत्र असून याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आंबेडकरी संघटनानी दिला आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले धम्मज्योती गजभिये यांची २०२० मध्ये बार्टीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी असतानाही त्यांना राज्यशासनाच्या सेवेत समाजसेवेसाठी रुजू झाले. बार्टी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणेताल शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांच्या पोटात दुखू लागले. यातून त्यांना बार्टीमधील आर्थिक गैरव्यवहारही उजेडात आणून कारवाई करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अनूसूचित जातीमधील घटकांसाठी नवनवीन योजना आणून त्यांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न केला. गेल्या अडीज वर्षात बार्टीचे नाव घराघरात पोहोचले असून अनेकांच्या तोंडी बार्टीचे नाव येऊ लागले. विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण योजना आणि परदेशी शिष्यवृत्तीमध्ये वाढ तर विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून शेकडो विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे द्वारे उघडून दिले. अल्पावधीत धम्मज्योती गजभिये यांचे नाव बार्टीसोबत लोकांच्या घरात आणि मनात पोहोचले. यामुळे बार्टीतील भ्रष्टाचारी लोकांच्या पोटात दुख लागले. प्रशिक्षण संस्थाकडून मिळणारा मलिदा खाण्यास मिळणे बंद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घाणेरडे आरोप करून  तसेच त्यांच्याविरोधात मोर्चे निवेदन देऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातही त्यांनी मागे पाऊल न घेता एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई केली. त्याच आकसातून घाणेरडे आणि जातीय राजकारण करून राजकीय दबावात ९ महिन्याची मुदत असतानाही बेकायदेशीरपणे त्यांना पदमुक्त करण्यात आले. हा प्रकारमध्ये आंबेडकरी चळवळीला संपविण्याचा प्रकार असल्याचा मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या विरोधातीत षडयंत्र कधीही खपवून घेतले जाणार नाही. संपूण आंबेडकरी समाज धम्मज्योती गजभिये यांच्या पाठिशी असून हे सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी देणाऱ्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला.

धम्मज्योती गजभिये यांना पदावर घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन

kavle
kavle

बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे पदमुक्त करून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. दुसरीकडे त्यांच्या ९ महिन्याचा कालवधी शिल्लक आहे. यामुळे त्यांना पदमुक्त करणे हे बेकायदेशीर आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या विभागाय चौकशीला घाबरूनच सरकार आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या दलालांनी त्यांच्याविरोधात कट रचला आहे. हा प्रकार हाणून पाडू, राज्यभर आंदोलन आणि मोर्चे काढून त्यांना सहकार्य करणाऱ्याचा प्रयत्न करण्यात येईल. प्रसंगी उच्च न्यायालयात जाऊन न्याय मागण्याच पर्यायसुद्धा ठेवला आहे. त्याप्रमाणे त्यांच्याच कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यालाही पदमुक्त करण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. हा लढा जातीयवादी सरकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्याविरोधातील आहे हे समजून घ्यावे.
राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते, महाराष्ट्र राज्य

संबंधित पोस्ट

तृणमूलच्या गुंडगिरीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार, नोकरीवरून काढून टाकलेल्यांना अर्थसाह्य

divyanirdhar

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर

divyanirdhar

नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला

divyanirdhar

निर्ढावलेल्या विकृतीला आवरा?

divyanirdhar

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

divyanirdhar

तीन वर्ष सांभाळले, शेवटी वनविभागानेच पकडले!

divyanirdhar