



नागपूर ः कोरोनामुळे शासकीय रुग्णालयात रुग्णांचा गर्दी होत आहे. त्याचा फटका आता रुग्णांनाच बसत आहे. रुग्णालयात औषध नसल्याचे सांगून बाहेरून औषधी घेऊन या सल्ला शासकीय रुग्णालयातील डॉक्टर देत आहे. यामुळे आता रुग्णांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर रुग्ण मात्र,पर्याय नसल्याने काय करावे, अशा मनःस्थितीमध्ये आहेत. शासनाने औषधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था चांगलीच ढासळली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली गेली. रुग्णावर उपचार करतानाही त्यांना यातना दिल्या जातात. राज्य आरोग्य यंत्रणा आहे किंवा नाही, असाच प्रश्न सध्या प्रत्येकांना पडत आहे. कोरोनानंतर परिस्थिती सावरीत आहे. मात्र कोरोना नंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनानंतर विविध आजार बळकावले आहे. दातदुखीसह इतर आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. मात्र, डॉक्टर त्यांना बाहेरून औषधी आणा म्हणून सांगतात. यामुळे आधीच बेरोजगार असलेला ग्रामीण भागातील रुग्ण शासकीय रुग्णालयात २० रुपये देऊन येत असली तरी त्याला खासगी दुकानातून औषधी घेणे परवडणारे नाही. मात्र, रुग्णालयात औषधी नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे रुग्णांमध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने शासकीय रुग्णालयाचा औषधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. शासनाने औषधी उपलब्ध करून दिली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कावळे यांनी दिली आहे.
खासगी रुग्णालयाला केले जाते रेफर
कोरोना झाल्यानंतर रुग्णांना विविध आजाराने घेरले आहे. ग्रामीण भागात यावर जनजागृती नसल्याने त्यांच्यासमोर शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नसते. मात्र, तिथेही त्यांना खासगी रुग्णालयाचा प्रेमाने मार्ग दाखविला जातो. भीतीपोटी आणि डॉक्टरकडून मिळालेल्या आश्वासनामुळे रुग्ण खासगी दाखल होत असून सामान्य आजारासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. यात डॉक्टरांचे कमिशन ठरले असल्याची माहिती आहे.