दिव्यनिर्धार/ जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, : नागेंद्र किसन वाकडे (धानोरा), सोनल अशोक धाडसे (तिरखुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वाघाची शिकार करून त्याच्या अवयवयाचा गुप्तधन काढण्यसाठी वापर केला जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुप्तधन काढण्यासाठी वाघाची शिकार करणार्याि दोघांना अटक करण्यात वनविभागाला यश आले आहे. आरोपींकडून मृत वाघाचे 11 नख, मिश्याचे 16 केस, 4 दात, 4 हाडे जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवार, 7 जून रोजी रात्री सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्यां नी केली.
मरेगाव नियतक्षेत्रातील कक्ष कमांक 261 मध्ये वाघाचा मृतदेह आढळला होता. मृत वाघाचे 11 नखे, संपूर्ण दात व मिश्या वगळून अन्य सर्व अवयव घटनास्थळी आढळून आले. चौकशीअंती घटनास्थळी आढळलेले सर्व अवयव जाळण्यात आले. यावेळी वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, विवेक करंबेडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. लाडे, डॉ. विवेक सुरपाम उपस्थित होते.
आरोपींविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2, 39, 48, 50, 51, 57 कलमान्वये वनगुन्हा नोंद करून अटक करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोन्ही आरोपींना 4 दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. ही कार्यवाही ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय पोलिस अधिकारी तारे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. गोंड यांनी केली.
previous post