Divya Nirdhar
Breaking News
tree
आंतरराष्ट्रीयसंपादकीय

गरज पर्यावरण संतुलनाची

दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी ‘होस्ट’ अथवा यजमान असतो. 2018 साली भारत यजमान असताना साजरा करण्यात आलेल्या 45 व्या पर्यावरण दिनाचा विषय होता.

 प्लास्टिकच्या प्रदूषणावर मात (Beat Plastic Pollution).2019 साली पर्यावरण दिनाची थीम होती हवेतलं प्रदूषण आणि यजमान देश होता चीन, 2020 वर्षासाठीची थीम आहे – बायोडाव्हर्सिटी (Biodiversity) म्हणजेच जैवविविधता. ब्राझील, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पेटलेल्या वणव्यांपासून ते पूर्व आफ्रिका, आशियातल्या टोळधाडी, जगभरात सध्या पसरलेली कोरोनाची साथ या सगळ्यामधून मानवजात आणि ते अवलंबून असलेल्या जैवविविधतेचा एकमेकांचा संबंध दिसून आलाय.हे संतुलन राखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याची जागरूकता पसरवण्यासाठी यावर्षी प्रयत्न केले जात आहेत.दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण यावर्षी जगभरात कोव्हिडची साथ पसरली असल्याने अनेक कार्यक्रमांचं आयोजन ऑनलाईन करण्यात येतंय.
. जलवायू प्रदूषण गेल्य काही वर्षांपासूनचा ऐरणीवरचा मुद्दा. तापमानवाढ आणि बिघडलेले पावसाचे गणीत हेसुद्धा बदलत्या पर्यावरणीय बदलाचेच कारण आहे. काही ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी तर, काही ठिकाणी कोरडा ठाक दुष्काळ. पर्वतीय प्रदेशात वाढत्या उष्णतेमुळे वारंवार वितळत जाणारे बर्फ आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर त्यामुळे जंगले आणि जलचर प्राण्यांवर होणारे परिणाम. त्यातून मानवी जिवनाला निर्माण होणाऱ्या समस्या हे एक प्रमुख आव्हान येत्या काळात असणार आहे.. मग हे प्रदुषण हवेचे, पाण्याचे, किंवा जमिनीचे असे कोणतेही असो. अनैसर्गिक शेती, कारखाने, प्लास्टिकचा अतिवापर, उंचच उंच उभारले जाणारे इमारतींचे टॉवर अशी एक ना अनेक कारणे प्रदुषणामागे आहेत. यावर सर्वांना विचारपूर्वक तोडगा काढावा लागणार आहे.कोणत्याही ठिकाणावरची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली की त्या ठिकाणचे भौगोलिक गणित बिघडलेच म्हणून समजा जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक चांगले जिवनमान देऊ इच्छित असाल तर, तुम्हाला जमीन आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवावेच लागेल. ही सृष्टी एक चक्र आहे. मग तो जीव मानव असो किंवा एकादा सूक्ष्म जिवाणू. प्रेत्येकाची गरज या सृष्टीला आहेत. पण शहरं आणि विकासाच्या नावाकाली झाडं तोडली जात आहेत. जंगलं उद्ध्वस्त केली जात आहेत. याचा परिणाम उदाहरण म्हणून जरी घेतला तरी दिसते की, मधमाशांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे फुलांचे परागकण विखुरले जात नाहीत. त्यामुळे फुला, फळांमध्ये बिजारोपन होत नाही. परिणामी नवी झाडे लागून निघण्याचे प्रमाण कमी होते. अशी ही आव्हाने येत्या काळात निर्माण झाली आहेत.
बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण,बदलत्या काळात पर्यावरनात वाढत चाललेलाकार्बनडॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येते. “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. आपण निसर्गातील अनेक संसाधनांचा वाजवी पेक्षा जास्त उपभोग घेत आहोत. पाणी, वायू, व जमीन यांचे प्रदूषण करण्यात आपण मागे नाहीत. याचेच दुष्परिणाम म्हणजे अनेक प्रकारची रोगराई म्हणूनच संसाधनाचा योग्य वापर, प्रदूषण न करण्याची उपाययोजना आवश्यकच आहे. स्वतःपुरता विचार करून चालणार नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यांच्यासाठी योग्य सृष्ठी आपल्याला ठेवावी लागेल नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.
जगातील प्रत्येक देशानी व देशातील जास्तीत जास्त प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करून सहकार्य केले तर वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्याय क्लोरे-फ्लुरो कार्बन ( CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्याावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्याि उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्वजनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.परंतु आज विकासाच्या नावावर 50 वर्षापुर्वी ची अनेक दुर्मिळ वृक्षाची वृक्षतोड़ करताना पर्यावरणाचा विचार करताना सुद्धा दिसत नाही.विकासकामाच्या नावावर 100 डौलदार वृक्ष तोडल्यास 1000 वृक्ष लागवड करण्यात येईल असे आस्वासन देत असताना 1000 वृक्षाची लागवड केल्यानंतर जगतात किती
,2 वर्षात 50% तरी वृक्ष जगले तरी ते सर्व मिळून डौलदार 1 वृक्षाचि बरोबरि करू शकते का?.आकडयाच्या खेळ राजकीय खेळी या सर्वामुळे पर्यावरणा चे संतुलन बिगड़त चालले .
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्नि

chandrashekhar nimat
chandrashekhar nimat

र्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

-चंद्रशेखर निमट 9518374941
आधार फाऊंडेशन अध्यक्ष पर्यावरण समिति, हिंगणघाट

संबंधित पोस्ट

बाबासाहेबांचे विचार घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी कटिबद्ध; बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचा निर्धार

divyanirdhar

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर

divyanirdhar

मुंबई झाली पुन्हा हवालदिल, पावसाचा कहर

divyanirdhar

नितीन गडकरी यांनी प्रशासनाला केले सावध म्हणाले, तिसऱ्या लाटेसाठी रहा सावध

divyanirdhar

बार्टी ः जातीचे नव्हे विकासाचे करा राजकारण

divyanirdhar

शेतकरी आंदोलन होणार अधिक आक्रमक, शेतकरी नेत्यांची घेतली ममतांची भेट

divyanirdhar